बोरघाटातील अपघातात १ ठार, २ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 06:26 IST2018-09-21T06:26:40+5:302018-09-21T06:26:46+5:30

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावरील अंडा पॉइंटवरील वळणावर दोन वाहनांच्या अपघातात एकाचा मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी झाले.

1 killed, 2 injured in accident in Borghat | बोरघाटातील अपघातात १ ठार, २ जखमी

बोरघाटातील अपघातात १ ठार, २ जखमी

खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावरील अंडा पॉइंटवरील वळणावर दोन वाहनांच्या अपघातात एकाचा मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी झाले. गुरुवारी पहाटे ४च्या सुमारास हा अपघात घडला आहे.
अपघाताच्या ठिकाणी एच.पी. कंपनीचे नवीन सिलिंडर वाहून नेणारा ट्रक व मुंबईकडून पुण्याकडे जाणारा टेम्पो समोरासमोर धडकले. धडक एवढी जबरदस्त होती की, ट्रकच्या केबिनचा चुराडा झाला. त्यातील एका जखमीला उपचारासाठी पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात हलवले. त्यानंतर टेम्पोचालकाला बाहेर काढण्यात आले. ट्रक ड्रायव्हर गणेश इल्लग (रा. सिन्नर) याला जिवंत बाहेर काढण्यासाठी बराच वेळ लागला. मात्र, अति रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

Web Title: 1 killed, 2 injured in accident in Borghat

टॅग्स :Accidentअपघात