शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

झेडपीच्या कर्मचाऱ्याचा प्रताप; खोटा शिक्का मारून भरले चलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 15:07 IST

बांधकाम विभागाकडे ठेकेदारांनी बँकेमध्ये चलनाद्वारे भरलेले पैसे त्यानंतर सही शिक्का असलेली चलने यांची आता बँकेकडे पडताळणी केली जाणार

पुणे :जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतो. आता तर ठेकेदाराचे चलन एका शिपायाने बँकेत न भरता पैसे भरल्याचा बँकेचा बनावट शिक्का मारून ते चलन बांधकाम विभागामध्ये जमा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित शिपाई कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे. या घटनेमुळे जिल्हा परिषदेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

निविदा मंजूर झाल्यानंतर त्याची अनामत रक्कम ही जिल्हा परिषदेकडून देण्यात येणाऱ्या चलनाद्वारे ठेकेदार ती रोखीने बँकेत भरतो. उत्तर बांधकाम विभागामध्ये कार्यरत असलेला शिपाई हा ठेकेदारांशी संगनमत करून काही कामे करून देतो. ठेकेदार देखील त्यांची काही पैशाची कामे शिपाई मार्फत करतात. बँकेमध्ये चलन भरण्यासाठी संबंधित चलन आणि रोखीचे पैसे या शिपायाकडे एका ठेकेदाराने दिले होते. मात्र हे पैसे प्रत्यक्ष बँकेत न भरता या शिपायाने बँकेचा सही-शिक्का संबंधित चलनावर मारून ते चलन परस्पर बांधकाम विभागाच्या फाईलमध्ये जोडून दिले. काहींच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर संबंधित ठेकेदाराला याबाबत विचारणा करण्यात आली.त्यानंतर शिपायानेच हा प्रताप केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी संबंधित शिपायाला नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच कार्यकारी अभियंता यांनी प्रत्यक्ष बोलवूनदेखील विचारणा केली. बांधकाम विभागाकडे ठेकेदारांनी बँकेमध्ये चलनाद्वारे भरलेले पैसे त्यानंतर सही शिक्का असलेली चलने यांची आता बँकेकडे पडताळणी केली जाणार असल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी सांगितले.

‘बांधकाम’ला आवरण्याचे सीईओंपुढे आव्हान

हा एक प्रकार उघडकीस आला असला तरी आतापर्यंत हजारोंच्या संख्येने चलने दिली जातात. बँकेमध्ये अनामत रक्कम भरली जाते. त्यामुळे पैसे भरल्याचा बँकेचा बनावट शिक्का मारून जिल्हा परिषदेकडे आतपर्यंत किती चलने जमा केली किंवा कसे, हा असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. अलीकडच्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील काही ठेकेदार बांधकाम विभागाचा कारभार चालवत असल्याचे चित्र जिल्हा परिषदेमध्ये पाहायला मिळत आहे. जिल्हा दिव्यांग केंद्रचे बांधकाम करताना मंजूर कामापेक्षा अधिक काम ठेकेदाराने केले होते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील काम त्याच ठेकेदाराला कसे मिळेल, याची व्यूहरचनादेखील काही अधिकाऱ्यांनी केली आणि ती यशस्वीही झाली. त्यामुळे नुकताच पदभार स्वीकारलेले मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासमोर ठेकेदारांबरोबरच बांधकाम विभागाला आवरण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडzpजिल्हा परिषदfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीMONEYपैसा