ZP Election 2026 : पुणे जिल्ह्यात निवडणुकीला उत्साहपूर्ण सुरुवात; इंदापूरमध्ये सर्वाधिक मतदान केंद्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 13:23 IST2026-02-07T13:23:21+5:302026-02-07T13:23:38+5:30

पहिल्या दोन तासांत जिल्ह्यात सरासरी 7.74 टक्के मतदान नोंदवले गेले

ZP Election 2026 Elections get off to an enthusiastic start in Pune district; Indapur has the highest number of polling stations | ZP Election 2026 : पुणे जिल्ह्यात निवडणुकीला उत्साहपूर्ण सुरुवात; इंदापूरमध्ये सर्वाधिक मतदान केंद्रे

ZP Election 2026 : पुणे जिल्ह्यात निवडणुकीला उत्साहपूर्ण सुरुवात; इंदापूरमध्ये सर्वाधिक मतदान केंद्रे

पुणे: राज्यभर सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात मतदान प्रक्रियेला शनिवारी सकाळपासून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. पहिल्या दोन तासांत जिल्ह्यात सरासरी 7.74 टक्के मतदान नोंदवले गेले असून ग्रामीण भागातील अनेक मतदान केंद्रांवर मतदारांनी लवकर हजेरी लावली.

जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शांततेत मतदान सुरू असून प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे प्रक्रिया सुरळीत पार पडताना दिसत आहे. सकाळच्या थंड वातावरणाचा फायदा घेत नागरिकांनी मतदानासाठी रांगा लावल्याचेही अनेक ठिकाणी पाहायला मिळाले.

इंदापूरमध्ये सर्वाधिक मतदान केंद्रे

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका मतदान केंद्रांच्या संख्येत आघाडीवर असून येथे तब्बल 400 केंद्रे उभारण्यात आली आहेत. पहिल्या दोन तासांत येथे 7.68 टक्के मतदान झाले. प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी केंद्रांचे योग्य नियोजन केल्याचे सांगितले जात आहे.

जिल्ह्यात 3,605 मतदान केंद्रांची व्यवस्था

निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाभरात एकूण 3,605 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. तालुकानिहाय केंद्रांची संख्या पुढीलप्रमाणे आहे:

बारामती – 299

मावळ – 243

मुळशी – 227

शिरूर – 337

हवेली – 263

दौंड – 317

इंदापूर – 400

पुरंदर – 235

भोर – 237

वेल्हे – 105

आंबेगाव – 239

जुन्नर – 366

खेड – 337

आदर्श व महिला मतदान केंद्रांवर विशेष भर

प्रत्येक तालुक्यात एक असे 13 आदर्श व महिला मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत. तसेच हवेली, भोर आणि इंदापूर तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक परदानशीन मतदान केंद्र सुरू करण्यात आले आहे, ज्यामुळे सर्व घटकांचा सहभाग वाढवण्यावर भर दिला जात आहे.  निवडणूक प्रशासनाने मतदारांना निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले असून दिवस पुढे सरकत असताना मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title : ZP चुनाव 2026: पुणे में उत्साहपूर्ण शुरुआत; इंदापुर में सर्वाधिक मतदान केंद्र

Web Summary : पुणे जिले में ZP चुनावों के लिए उत्साहपूर्ण मतदान हुआ, पहले दो घंटों में 7.74% मतदान दर्ज किया गया। इंदापुर में सबसे अधिक 400 मतदान केंद्र हैं। अधिकारियों ने जिले भर में 3,605 केंद्र स्थापित किए हैं और निडर भागीदारी को प्रोत्साहित कर रहे हैं।

Web Title : Enthusiastic Start to ZP Election 2026; Indapur has most polling booths.

Web Summary : Pune district witnessed enthusiastic voting for ZP elections, with 7.74% turnout in the first two hours. Indapur leads with 400 polling centers. Authorities have established 3,605 centers across the district and are encouraging fearless participation.