ZP Election 2026 : पहिल्या दोन तासांत ७.७४% मतदान;भोर तालुका आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 12:51 IST2026-02-07T12:51:12+5:302026-02-07T12:51:44+5:30
पहिल्या दोन तासांत जिल्ह्यात सरासरी ७.७४ टक्के मतदान नोंदवले गेले असून ग्रामीण भागातील मतदार केंद्रांवर मतदारांची रांग पाहायला मिळत आहे.

ZP Election 2026 : पहिल्या दोन तासांत ७.७४% मतदान;भोर तालुका आघाडीवर
पुणे: राज्यभर सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये पुणे जिल्ह्यात मतदानाला सकाळपासून उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पहिल्या दोन तासांत जिल्ह्यात सरासरी ७.७४ टक्के मतदान नोंदवले गेले असून ग्रामीण भागातील मतदार केंद्रांवर मतदारांची रांग पाहायला मिळत आहे.
अजित पवार यांच्या निधनामुळे या निवडणुकीचे मतदान काही काळासाठी पुढे ढकलण्यात आले होते. मात्र सुधारित वेळापत्रकानुसार आज मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत आहे. प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था कडक ठेवत मतदान सुरळीत होण्यासाठी विशेष नियोजन केले आहे.
तालुकानिहाय आकडेवारीनुसार भोर तालुक्यात सर्वाधिक ८.७९ टक्के मतदान झाले आहे. त्यापाठोपाठ मावळ (८.६३%) आणि आंबेगाव (८.५६%) या तालुक्यांमध्येही चांगला प्रतिसाद मिळाला. बारामतीमध्ये मात्र तुलनेने कमी म्हणजे ६.५२ टक्के मतदान नोंदले गेले आहे.
तालुकानिहाय मतदान टक्केवारी:
भोर – ८.७९%
मावळ – ८.६३%
आंबेगाव – ८.५६%
दौंड – ८.१२%
पुरंदर – ८.१०%
वेल्हे – ७.९१%
हवेली – ७.७९%
इंदापूर – ७.६८%
खेड – ७.६५%
जुन्नर – ७.४२%
शिरूर – ७.२१%
मुळशी – ७.०३%
बारामती – ६.५२%
दरम्यान, पुढील काही तासांत मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. ग्रामीण भागातील विकासाच्या मुद्द्यांवर ही निवडणूक महत्त्वाची मानली जात असल्याने संध्याकाळपर्यंत मोठ्या प्रमाणावर मतदार घराबाहेर पडतील, असा अंदाज आहे.