शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

‘झिंग झिंग झिंगाट डान्सर’ कार्यकर्त्यांना चकवा देत नवरदेवाची लग्नमंडपात दुचाकीवरुन एंट्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 20:24 IST

अति उत्साहात नाचणाऱ्या कार्यकर्त्यांनी नवरदेवालाच रोखून धरले.. मुहूर्ताला मांडवात पोहचण्याची नवरदेवाची धडपड सुरु ...

पुणे ( दौंड) : लग्न म्हटले की बँडबाजा आला... आणि बँडबाजा म्हटले की नवरदेवाच्या कार्यकर्त्यांचा जोशपूर्ण ‘  झिंग झिंग झिंगाट डान्स ’ आला.. दौंड तालुक्यातही असाच एक मजेदार प्रसंग घडला..अतिउत्साहात नाचणाऱ्या कार्यकर्त्यांनी नवरदेवालाच रोखून धरले.. नवरदेवाची मुहूर्ताला मांडवात पोहचण्याची घाई.. पण कार्यकर्ते काही केल्या माघार घ्यायला तयार होईना... तिकडे वऱ्हाडी मंडळी मुहूर्त जवळ येतोय पण अजून नवरदेव मंडपात नाही म्हणून चिंताग्रस्त.. मग एकाने लढवली शक्कल.. ...आणि नवरदेव थेट दुचाकीवरुन विवाहमंडपात पोहचला.. दौंड तालुक्यातील देलवडी येथील वर दत्तात्रेय चव्हाण व पंढरपूर तालुक्यातील बंडीशेगावच्या मयुरी पवार यांच्या लग्नाची ही गोष्ट.. लग्नामध्ये डान्स करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हट्ट मोडून लग्नाची वेळ मुहूर्ताला पोहचण्याकरिता घोड्यावर बसलेल्या नवरदेवाने चक्क दुचाकीवर लग्न मंडपामध्ये एन्ट्री घेतली आणि सर्वांच्याच नजरा आवाक झाल्या...याबाबत सविस्तर हकीकत अशी की, दत्तात्रेय व मयुरी यांचा विवाह रविवारी (दि. ३१ ) दुपारी एक वाजून ४५ मिनिटांनी होता. दुपारची लग्नाची वेळ असल्याने लग्न मंडपांमध्ये सर्व वऱ्हाडी मंडळी वेळेमध्ये जमली. लग्नघटिका जवळ आली तरी पारण्यासाठी गेलेला नवरदेव लग्न मंडपामध्ये येईना.. याबाबत सविस्तर माहिती घेतल्यानंतर लक्षात आले की, काही अतिउत्साही कार्यकर्ते हे नवरदेवाला पारण्यामध्ये येण्यापासून रोखत आहे. अतिउत्साहामध्ये लग्नाची वेळ जवळ आली आहे हे त्यांच्या काही केल्या लक्षात येत नव्हते. इकडे वराडी मंडळींना दुपारची वेळ असल्याने अंगाचा गरमाइने तिळपापड उडाला होता. कार्यकर्ते आपल्या हट्टावरती ठाम होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुभाष गायकवाड यांनी एक शक्कल लढवली .आपली दुचाकी गाडी थेट नवरदेव पारण्याच्या वरातीमध्ये घुसवली. आणि जवळपास शंभर कार्यकर्त्यांच्या गराड्यामधून नवरदेवाला चक्क घोड्यावरुन दुचाकीवरती पाठीमागे बसवले. यावेळी कार्यकर्त्यांनी नवरदेवाला जाण्यासाठी विरोध केला. आम्ही लग्नाला येणार नाही असा हट्ट घेतला. परंतु, त्यांच्या विरोधाला न जुमानता गायकवाड यांनी नवरदेवाला सोबत घेतले. आणि अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरात नवरदेव थेट लग्न मंडपामध्ये अवतरला . लग्न लागल्यानंतर नाराज चेहरा करुन एक एक कार्यकर्ता सभामंडपी हजर होऊ लागला. एकूणच नवरदेवाच्या दुचाकीवरच्या लग्नमंडपामधील एन्ट्रीची चर्चा दिवसभर परिसरात रंगली होती.

टॅग्स :Puneपुणेmarriageलग्नtwo wheelerटू व्हीलर