‘झिंग झिंग झिंगाट डान्सर’ कार्यकर्त्यांना चकवा देत नवरदेवाची लग्नमंडपात दुचाकीवरुन एंट्री 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 07:46 PM2019-03-31T19:46:40+5:302019-03-31T20:24:34+5:30

अति उत्साहात नाचणाऱ्या कार्यकर्त्यांनी नवरदेवालाच रोखून धरले.. मुहूर्ताला मांडवात पोहचण्याची नवरदेवाची धडपड सुरु ...

'Zing Zing Zhingat Dancer' and marrige ceremoney.. | ‘झिंग झिंग झिंगाट डान्सर’ कार्यकर्त्यांना चकवा देत नवरदेवाची लग्नमंडपात दुचाकीवरुन एंट्री 

‘झिंग झिंग झिंगाट डान्सर’ कार्यकर्त्यांना चकवा देत नवरदेवाची लग्नमंडपात दुचाकीवरुन एंट्री 

Next

पुणे ( दौंड) : लग्न म्हटले की बँडबाजा आला... आणि बँडबाजा म्हटले की नवरदेवाच्या कार्यकर्त्यांचा जोशपूर्ण ‘  झिंग झिंग झिंगाट डान्स ’ आला.. दौंड तालुक्यातही असाच एक मजेदार प्रसंग घडला..अतिउत्साहात नाचणाऱ्या कार्यकर्त्यांनी नवरदेवालाच रोखून धरले.. नवरदेवाची मुहूर्ताला मांडवात पोहचण्याची घाई.. पण कार्यकर्ते काही केल्या माघार घ्यायला तयार होईना... तिकडे वऱ्हाडी मंडळी मुहूर्त जवळ येतोय पण अजून नवरदेव मंडपात नाही म्हणून चिंताग्रस्त.. मग एकाने लढवली शक्कल.. ...आणि नवरदेव थेट दुचाकीवरुन विवाहमंडपात पोहचला.. 
दौंड तालुक्यातील देलवडी येथील वर दत्तात्रेय चव्हाण व पंढरपूर तालुक्यातील बंडीशेगावच्या मयुरी पवार यांच्या लग्नाची ही गोष्ट.. लग्नामध्ये डान्स करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हट्ट मोडून लग्नाची वेळ मुहूर्ताला पोहचण्याकरिता घोड्यावर बसलेल्या नवरदेवाने चक्क दुचाकीवर लग्न मंडपामध्ये एन्ट्री घेतली आणि सर्वांच्याच नजरा आवाक झाल्या...याबाबत सविस्तर हकीकत अशी की, दत्तात्रेय व मयुरी यांचा विवाह रविवारी (दि. ३१ ) दुपारी एक वाजून ४५ मिनिटांनी होता. दुपारची लग्नाची वेळ असल्याने लग्न मंडपांमध्ये सर्व वऱ्हाडी मंडळी वेळेमध्ये जमली. लग्नघटिका जवळ आली तरी पारण्यासाठी गेलेला नवरदेव लग्न मंडपामध्ये येईना.. याबाबत सविस्तर माहिती घेतल्यानंतर लक्षात आले की, काही अतिउत्साही कार्यकर्ते हे नवरदेवाला पारण्यामध्ये येण्यापासून रोखत आहे. अतिउत्साहामध्ये लग्नाची वेळ जवळ आली आहे हे त्यांच्या काही केल्या लक्षात येत नव्हते. इकडे वराडी मंडळींना दुपारची वेळ असल्याने अंगाचा गरमाइने तिळपापड उडाला होता. कार्यकर्ते आपल्या हट्टावरती ठाम होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुभाष गायकवाड यांनी एक शक्कल लढवली .आपली दुचाकी गाडी थेट नवरदेव पारण्याच्या वरातीमध्ये घुसवली. आणि जवळपास शंभर कार्यकर्त्यांच्या गराड्यामधून नवरदेवाला चक्क घोड्यावरुन दुचाकीवरती पाठीमागे बसवले. यावेळी कार्यकर्त्यांनी नवरदेवाला जाण्यासाठी विरोध केला. आम्ही लग्नाला येणार नाही असा हट्ट घेतला. परंतु, त्यांच्या विरोधाला न जुमानता गायकवाड यांनी नवरदेवाला सोबत घेतले. आणि अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरात नवरदेव थेट लग्न मंडपामध्ये अवतरला . लग्न लागल्यानंतर नाराज चेहरा करुन एक एक कार्यकर्ता सभामंडपी हजर होऊ लागला. एकूणच नवरदेवाच्या दुचाकीवरच्या लग्नमंडपामधील एन्ट्रीची चर्चा दिवसभर परिसरात रंगली होती.

Web Title: 'Zing Zing Zhingat Dancer' and marrige ceremoney..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.