शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
3
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
4
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
5
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
6
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
7
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
8
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
9
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
10
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
11
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
12
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
13
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
14
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
15
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
16
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
17
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
18
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
19
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
20
भारतीय रस्त्यावर धावणार १००% इथेनॉलवरील वाहने; सरकारने मांडला वाहन उत्सर्जन नियम बदल प्रस्ताव
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेला २२ एप्रिलपासून मिळणार रेमडेसिविर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांसाठी दिलासादायक बातमी आहे. पुणे जिल्हा परिषदेला २२ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांसाठी दिलासादायक बातमी आहे. पुणे जिल्हा परिषदेला २२ एप्रिलपासून रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करणार आहे. यात पहिल्याच दिवशी दोन हजार रेमडेसिविर इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेने ५० लाख रुपयांची साडेबारा हजार इंजेक्शन सिप्ला कंपनीकडून खरेदी केली आहेत. त्यातील दोन हजार इंजेक्शनचा पाहिला पुरवठा २२ एप्रिल नंतर होणार आहे.

सिप्ला कंपनीना त्यांचे रेमडेसिविर हे इंजेक्शन १४६४ रुपया दराने जिल्हा परिषदेला दिले आहे. ५० लाख रुपयांची ही इंजेक्शन खरेदी असून टप्प्याटप्प्याने आणि गरजेप्रमाणे इंजेक्शनचा पुरवठा जिल्हा परिषदेला केला जाणार आहे. ही इंजेक्शन्स फक्त ग्रामीण भागातील रुग्णांसाठी वापरले जाणार असून, त्याचे नियंत्रण तालुका आरोग्य अधिकारी मार्फत केले जाणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे आणि आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांनी सांगितले. आवश्यकता वाटल्यास खरेदी दोन कोटी रुपयापर्यंत करण्याची तयारी जिल्हा परिषदेने केली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, रेमडेसिविर हे इंजेक्शन खरेदीचे आदेश काढण्यात आले आहेत. सिप्ला कंपनीचे हे इंजेक्शन असून कंपनीकडून टप्प्याटप्प्याने त्याचा पुरवठा केला जाईल. पहिल्या टप्प्यातील दोन हजार इंजेक्शन्स २२ एप्रिल पासून मिळण्याची शक्यता आहे. ही इंजेक्शन्स जिल्हा परिषदेच्या मार्फत वितरित केली जातील मात्र शासनाच्या अन्न आणि औषध प्रशासन या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या इंजेक्शन पुरवठ्याची याचा संबंध नसेल. तुटवडा आणि काळाबाजार रोखण्यासाठी उचललेले हे पाऊल आहे. सरकारी आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये शासनामार्फत या इंजेक्शनचा पुरवठा होईल असे त्यांनी स्पष्ट केले.

-------

ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन जिल्हा परिषदेकडून खरेदी किंमतीचा उपलब्ध करून दिले जाईल. इंजेक्शन वितरणासाठी स्वतंत्रपणे नियमावली आणि प्रोटोकॉल असेल. इंजेक्शन खरेदीसाठी उपलब्ध करून दिलेला निधी हा इंजेक्शन विक्रीतून पुन्हा जिल्हा परिषद निधी मध्ये जमा होणार असल्याने तू पुन्हा पुन्हा वापरता येईल. इंजेक्शनची काळ्‍या बाजाराने होणारी विक्री रोखणे आणि रुग्णांना वेळेत उपलब्ध करून देणे यासाठी तातडीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

- निर्मला पानसरे, अध्यक्ष जिल्हा परिषद