ZP Election 2026: बारामतीत मतदानाला सुरुवात;प्रशासन सज्ज,२.६४ लाख मतदार बजावणार हक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 09:59 IST2026-02-07T09:58:40+5:302026-02-07T09:59:03+5:30

बारामती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.

Zilla Parishad Election Voting begins in Baramati; 2.64 lakh voters will exercise their rights | ZP Election 2026: बारामतीत मतदानाला सुरुवात;प्रशासन सज्ज,२.६४ लाख मतदार बजावणार हक्क

ZP Election 2026: बारामतीत मतदानाला सुरुवात;प्रशासन सज्ज,२.६४ लाख मतदार बजावणार हक्क

बारामती : संपूर्ण राज्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे या निवडणुकीचे मतदान पुढे ढकलण्यात आले होते. बारामती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.

बारामती तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी प्रशासन पूर्णतः सज्ज झाले आहे. तालुक्यातील एकूण ६ जिल्हा परिषद गट व १२ पंचायत समिती गणांसाठी आज ७ फेब्रुवारी रोजी मतदान, तर ९ फेब्रुवारी रोजी जिल्हा क्रीडा संकुल, बारामती येथे मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.

जिल्हा परिषद गटांमध्ये सुपा (३), गुणवडी (३), पणदरे (९), वडगाव निंबाळकर (५), निंबुत (६) आणि निरावागज (५) असे एकूण ३१ उमेदवार रिंगणात आहेत. पंचायत समिती गणांमध्ये सुपा (२), काहऱ्हाटी (२), शिर्सुफळ (३), गुणवडी (४), पणदरे (६), मुढाळे (३), मोरगाव (३), वडगाव निंबाळकर (७), निंबुत (७), कांबळेश्वर (२), निरावागज (२), डोर्लेवाडी (२) असे एकूण ४३ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी २५ तालुकास्तरीय समन्वय अधिकारी, ४० क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

 याशिवाय ६ भरारी पथके (१८ कर्मचारी), ८ स्थिर निरीक्षण पथके (२४ कर्मचारी), १२ व्हिडीओ निरीक्षण पथके (३६ कर्मचारी) आणि २ व्हिडीओ व्ह्यूइंग पथके (४ कर्मचारी) कार्यरत राहणार आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी १,९४५ अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक क्षेत्राची लोकसंख्या ३ लाख १६४ असून, एकूण मतदारसंख्या २ लाख ६४ हजार ६४२ आहे. त्यामध्ये पुरुष १,३५,०७३, महिला १,२९,५६० आणि इतर ९ मतदारांचा समावेश आहे. तालुक्यात २९९ मतदान केंद्रे आहेत.

Web Title : बारामती जिला परिषद चुनाव शुरू; प्रशासन तैयार, लाखों करेंगे मतदान

Web Summary : बारामती में जिला परिषद चुनाव स्थगित होने के बाद शुरू हुआ। छह जिला परिषद समूहों और बारह पंचायत समिति निर्वाचन क्षेत्रों में 2.64 लाख से अधिक मतदाता भाग लेंगे। सुचारू चुनाव प्रक्रिया सुनिश्चित करने के लिए अधिकारियों ने कर्मियों, उड़न दस्तों और निगरानी टीमों को तैनात किया है, मतगणना 9 फरवरी को होगी।

Web Title : Baramati Zilla Parishad Election Begins; Administration Ready, Lakhs To Vote

Web Summary : Baramati's Zilla Parishad election commences after postponement. Over 2.64 lakh voters across six Zilla Parishad groups and twelve Panchayat Samiti constituencies will participate. Authorities have deployed personnel, flying squads, and monitoring teams to ensure a smooth election process, with vote counting scheduled for February 9th.