ZP Election 2026: दौंडमध्ये राजकीय रणधुमाळी: जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या २१ जागांसाठी आज मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 10:04 IST2026-02-07T10:04:25+5:302026-02-07T10:04:53+5:30

दौंडला २१ जागांसाठी होणार मतदान

Zilla Parishad Election Political battle in Daund: Voting for 21 Zilla Parishad-Panchayat Samiti seats today | ZP Election 2026: दौंडमध्ये राजकीय रणधुमाळी: जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या २१ जागांसाठी आज मतदान

ZP Election 2026: दौंडमध्ये राजकीय रणधुमाळी: जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या २१ जागांसाठी आज मतदान

दौंड : संपूर्ण राज्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. दौंड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदानाची पूर्ण तयारी झाली आहे. मतदारांनी उत्साहाने मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे, साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अरुण शेलार आणि नायब तहसीलदार राजेश कानसकर यांनी संयुक्तरीत्या केले आहे. मतपेट्या सुरक्षितपणे मतदान केंद्रावर रवाना करण्यात आल्या आहेत.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या २१ 3 जागांसाठी ३१७ मतदान केंद्रे कार्यरत करण्यात आली असून, या कामासाठी एकूण २२९४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत स्थिर पथक ६, भरारी पथक ६ आणि व्हिडीओ सर्वेक्षण पथक ६ कार्यरत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुक्यातील मतदारांची संख्या २ लाख ७३ हजार १०० आहे. त्यापैकी पुरुष मतदार १ लाख ४० हजार ४१४, महिला मतदार १ लाख ३२ हजार ६७९ आणि इतर ७ मतदार आहेत.

Web Title : दौंड जिला परिषद चुनाव: राजनीतिक घमासान, आज मतदान

Web Summary : दौंड जिला परिषद और पंचायत समिति चुनावों के लिए तैयार है। 2,73,100 मतदाता 317 मतदान केंद्रों पर 2294 कर्मचारियों के साथ मतदान करेंगे। अधिकारियों ने उत्साही भागीदारी का आग्रह किया।

Web Title : Daund Zilla Parishad Election: Fierce Political Battle, Voting Today

Web Summary : Daund is ready for Zilla Parishad & Panchayat Samiti elections. 2,73,100 voters will vote at 317 polling centers with 2294 staff. Authorities urge enthusiastic participation.