शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Zilla Parishad Election : शिरुर तालुक्यातील राष्ट्रवादीमध्ये धुसफूस झाली सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 13:48 IST

महानगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित निवडणूक लढवल्या.

पुणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने चांगलेच यश मिळवले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे लढल्या होत्या. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिलजमाई करत एकत्रित लढण्याची घोषणा केली आहे. मात्र, निवडणुका संपताच जुळलेली मने पुन्हा दूर जाऊ लागली आहेत. शिरुर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवारांना शुभेच्छा देणारी पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या विजयी उमेदवारांना टाळण्यात आल्याचे दिसत आहे. त्यामुळे शिरुर तालुक्यातील राष्ट्रवादीमध्ये धुसफूस झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.

महानगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित निवडणूक लढवल्या. त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही अपवाद वगळता सर्वत्र एकत्रितच निवडणूक लढवली गेली. शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जुन्नर येथे पत्रकार परिषद घेऊन एकत्रित निवडणूक लढवण्याची घोषणाही केली. त्यानंतर अंतर्गत गटबाजी कमी करण्याबरोबरच आजी-माजी आमदारांमध्येही दिलजमाई करण्यात आली. या निवडणुका एकत्रितपणे लढण्यात आल्या. सात पैकी चार गटांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला. तर १४ पैकी आठ जागा मिळवत पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला. मनोमिलनामुळे हे शक्य झाले असून आता सभापती आणि उपसभापतींची निवड होणार असून तत्पूर्वीच थंड पडलेला कलह पुन्हा नव्याने समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर एक शुभेच्छाची पोस्ट व्हायरला होऊ लागली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या गट आणि गणातील विजयी उमेदवारांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. पण यामध्ये सर्वच उमेदवार नाही. केवळ तीन विजयी उमेदवारांना वगळून इतर सर्व विजयी उमेदवारांचे फोटो असून शरद पवारांसह सुनेत्रा पवार, अजित पवार तसेच पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा फोटो वापरण्यात आला आहे.

ही पोस्ट शिरुर तालुक्यात व्हायरल होत असून यावरून पुन्हा एकदा शिरुर तालुक्यातील राष्ट्रवादीमध्ये धुसफूस झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. कोणी म्हणत की कार्यकर्त्यांनी ही शुभेच्छाची पोस्ट तयार केली आहे तर कोणी म्हणत की अनावधानाने हे सर्व घडले आहे. या पोस्टबाबत उलसुलट चर्चेला ऊत आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर पक्षात आलबेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये एकत्र आलेल्या दोन्ही राष्ट्रवादी विभक्त होणार की एकत्रित राहणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

पंचायतच्या सभापतीपदासाठी भाजपची फिल्डिंग

शिरुर पंचायत समितीमध्ये पाच जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. सत्ता नसली तरी राष्ट्रवादीत सुरू झालेल्या अंतर्गत धुसफूसीचा फायदा घेत सभापतीपदासाठी भाजपने फिल्डिंग लावल्याची चर्चा रंगू लागल्या आहेत. यामुळे शिरुरचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघत आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Infighting Surfaces in Shirur NCP Despite United Election Efforts.

Web Summary : Despite united efforts during recent elections, internal strife has resurfaced within the Shirur NCP. A congratulatory post omitting key Pawar faction members fuels speculation about a renewed rift and BJP's potential advantage in Panchayat elections.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेZilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६