शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ZP Election 2026: तासभर उभी चढण, लोखंडी शिडी..! पुण्यातील सर्वात उंच रायरेश्वर मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांची थरारक चढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 11:55 IST

- एक तास उभी चढण, वळणावळणाची वाट आणि लोखंडी शिडीच्या साहाय्याने कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्र गाठले.

भोर -पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्याच्या पठारावरील मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांना कठीण पायी प्रवास करावा लागला. वाहनाने पायथ्यापर्यंत सुमारे ४० किलोमीटर प्रवास केल्यानंतर पुढील एक तास उभी चढण, वळणावळणाची वाट आणि लोखंडी शिडीच्या साहाय्याने कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्र गाठले.आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून, प्रत्येक पात्र मतदाराला लोकशाहीच्या महाउत्सवात सहभागी होता यावे यासाठी प्रशासनाने दुर्गम भागातही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. भोर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे मतदान साहित्याचे वितरण सकाळी १० वाजता सुरू झाले. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास खरात यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेबाबत सूचना देण्यात आल्या. रायरेश्वर मतदान केंद्र दुर्गम असल्याने भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या विशेष बॅकपॅकचे वितरण डॉ. खरात यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मतदान पथकाने आवश्यक साहित्य घेऊन कठीण मार्गक्रमण करत केंद्रावर यशस्वीरित्या पोहोचले.या मतदान केंद्राची स्थापना १६० मतदारांसाठी करण्यात आली आहे. दमछाक करणाऱ्या चढाईनंतरही लोकशाही प्रक्रियेत आपले योगदान देताना कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि उत्साह दिसून येत होता. डॉ. विकास खरात म्हणाले की, देशातील प्रत्येक पात्र मतदारापर्यंत मतदानाची सुविधा पोहोचवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. राज्यातील अनेक दुर्गम भागांत मतदान कर्मचारी विविध आव्हाने पेलत नागरिकांना लोकशाहीच्या उत्सवात सहभागी करून घेत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Remote polling station: Election staff trek to Raigad fort.

Web Summary : Election staff overcame a challenging trek to reach a remote polling station at Raigad fort for Zilla Parishad elections. Despite difficult terrain, including steep climbs and iron ladders, they ensured voting access for all eligible voters, demonstrating commitment to democratic participation.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडZilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र