Zilla Parishad Election : इंदापूर तालुक्यात सर्वाधिक अर्ज; छाननीनंतर प्रमुख उमेदवारांचे अर्ज वैध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 09:39 IST2026-01-23T09:33:30+5:302026-01-23T09:39:18+5:30

इंदापूर तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या गटांसाठी सर्वाधिक ११४ अर्ज दाखल झाले

Zilla Parishad Election Highest number of applications in Indapur taluka; Applications of major candidates are valid after scrutiny | Zilla Parishad Election : इंदापूर तालुक्यात सर्वाधिक अर्ज; छाननीनंतर प्रमुख उमेदवारांचे अर्ज वैध

Zilla Parishad Election : इंदापूर तालुक्यात सर्वाधिक अर्ज; छाननीनंतर प्रमुख उमेदवारांचे अर्ज वैध

पुणे: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तिकिटांचा गोंधळ पाहायला मिळाला. या गोंधळामध्येच ७३ गटांसाठी तब्बल ६४१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी १ हजार १६५ अर्ज आले आहेत. गुरुवारी झालेल्या अर्जाच्या छाननीमध्ये किरकोळ अर्ज वगळता प्रमुख उमेदवारांचे अर्ज वैध ठरणार आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काही जणांना एबी फॉर्म मिळाले तर काहींना थेट अर्ज दाखल करण्याच्या काही वेळ आधीच एबी फॉर्म दिले गेल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. शिरूरमध्ये इच्छुक उमेदवार, समर्थक व कार्यकर्त्यांची अचानक झालेली गर्दी, धक्काबुक्की आणि गोंधळामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

७३ गटांसाठी तब्बल ६४१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी १ हजार १६५ अर्ज आले आहेत. इंदापूर तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या गटांसाठी सर्वाधिक ११४ अर्ज दाखल झाले असून, पंचायत समितीच्या गणांसाठीही इंदापूर तालुक्यातूनच सर्वाधिक २१३ अर्ज आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली असून गुरुवारी झालेल्या छाननीमध्ये किरकोळ अर्ज वगळता प्रमुख उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. जुन्नर आणि इंदापूरमध्ये प्रत्येकी पंचायत समिती गणातील चार आणि पाच उमेदवारांचे अर्ज बाद झाले. आंबेगाव आणि इंदापूरमध्ये गटात प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला. छाननीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली. मंगळवारी दि. २७ जानेवारी हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे.

काही माजी सदस्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अजित पवार गटाने इंदापूरमध्ये अभिजित तांबिले, सदस्यांना बारामती प्रमोद काकडे, भोरमध्ये चंद्रकांत बाठे यांना उमेदवारी दिली नाही, तर विवेक वळसे-पाटील, सुनिता शरद बुट्टे-पाटील, शांताराम इंगवले, रणजित शिवतारे, वीरधवल जगदाळे, विक्रम खुटवड, रेखा बांदल, पूजा पाएंगे, यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडून आशा बुचके, भाऊ गुंड, बाबूराव वायकर, राजेंद्र गावडे यांना उमेदवारी दिली आहे.

दौंडला १७ अर्ज बाद

दौंड : दौंडला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या छाननी प्रक्रियेत १७ अर्ज बाद झाले असल्याची माहिती असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी रेवणनाथ लबडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, तथा तहसीलदार अरुण शेलार यांनी संयुक्तरीत्या दिली. जिल्हा परिषदेच्या एकूण सात गटात ४ तर १४ गणात १३ अर्ज बाद झाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात एकूण २३४ अर्ज दाखल झाले होते.

आंबेगावमध्ये ठेकेदार प्रकरणामुळे अर्ज बाद

घोडेगाव: आंबेगाव तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत गटाच्या पाच जागेसाठी २७ तर पंचायत समितीच्या १० जागांसाठी ५८ अर्ज दाखल झाले आहेत घोडेगाव येथे तहसील कार्यालयात या सर्व अर्जांची छाननी करण्यात आली यामध्ये पारगाव गटातील रवींद्र जनार्दन वळसे यांचा अर्ज बाद करण्यात आला संबंधित उमेदवार ठेकेदार असल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला त्यांच्या अर्जावर हरकतदेखील आली होती बाकी सर्व अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांनी वैध ठरवले. अवसरी खुर्द गणातील नीलेश टेमकर यांच्या अर्जावर जिल्हा परिषदेचे गटनेते देवीदास दरेकर यांनी हरकत घेतली. संबंधित उमेदवार हा ठेकेदार असून त्याचा अर्ज बाद करावा अशी लेखी मागणी त्यांनी केली. मात्र त्यांच्या तक्रारीचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळला. संबंधित उमेदवाराने अर्ज भरताना तो ठेकेदार नसल्याबाबतचा दाखला जोडला आहे व जर तो खरोखर ठेकेदार असेल तर तक्रारदार यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अपील करावे असे सांगत तक्रार अर्ज फेटाळला.

Web Title : इंदापूर में सर्वाधिक आवेदन; जांच के बाद प्रमुख उम्मीदवारों के फॉर्म वैध

Web Summary : इंदापूर में जिला परिषद और पंचायत समिति के सर्वाधिक आवेदन दर्ज किए गए। जांच में प्रमुख उम्मीदवारों के फॉर्म वैध पाए गए। एबी फॉर्म को लेकर भ्रम की स्थिति रही। दौंड में 17 आवेदन रद्द किए गए। ठेकेदार होने के कारण आंबेगांव में एक उम्मीदवार का आवेदन खारिज कर दिया गया। उम्मीदवारों की अंतिम सूची घोषित; 27 जनवरी तक नाम वापस लिए जा सकते हैं।

Web Title : Indapur Sees Highest Applications; Key Candidates' Forms Validated Post-Scrutiny

Web Summary : Indapur recorded the most Zilla Parishad and Panchayat Samiti applications. Scrutiny validated key candidates. Confusion arose over AB forms. Daund saw 17 rejections. A contractor's application was rejected in Ambegaon due to conflict of interest. Final candidate list declared; withdrawals allowed until January 27.