ZP Election 2026 :हर्षवर्धन पाटील सहकुटुंब मतदानासाठी बावड्यात; “निर्भयपणे मतदान करा” मतदारांना संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 11:44 IST2026-02-07T11:43:54+5:302026-02-07T11:44:59+5:30

तळागाळातील मतदार विकासावरच मतदान करतो; माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा विश्वास

Zilla Parishad Election Harshvardhan Patil and his family in Bawda to vote Message to voters Vote fearlessly | ZP Election 2026 :हर्षवर्धन पाटील सहकुटुंब मतदानासाठी बावड्यात; “निर्भयपणे मतदान करा” मतदारांना संदेश

ZP Election 2026 :हर्षवर्धन पाटील सहकुटुंब मतदानासाठी बावड्यात; “निर्भयपणे मतदान करा” मतदारांना संदेश

बावडा (ता. इंदापूर) - जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथील मतदान केंद्र क्रमांक 72/20, बूथ क्रमांक 315अ येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी तळागाळातील मतदार विकासाच्या मुद्द्यावरच निर्णय घेतो, असा विश्वास व्यक्त केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे मतदान हा लोकशाहीचा उत्सव आहे. प्रत्येक नागरिकाने निर्भय आणि मोकळ्या वातावरणात आपल्या विवेकबुद्धीनुसार मतदान करावे,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच मतदानाची टक्केवारी वाढणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. निवडणूक प्रक्रियेदरम्यान काही सहकाऱ्यांची कायमची अनुपस्थिती जाणवत असल्याने मनात दुःख असल्याचे सांगत त्यांनी कर्तव्य म्हणून मतदान करणे महत्त्वाचे असल्यावर भर दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या निवडणुकीत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले असल्याचे सांगत, इंदापूर तालुका आणि पुणे जिल्ह्यातील मतदारांनी विकासाचा विचार करून उमेदवारांना समर्थन द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी निराभिमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार अंकिता पाटील, राजवर्धन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असेही पाटील यांनी शेवटी नमूद केले.

Web Title : हर्षवर्धन पाटिल ने परिवार संग बावड़ा में मतदान किया; मतदाताओं से वोट करने का आग्रह।

Web Summary : हर्षवर्धन पाटिल ने परिवार के साथ जिला परिषद चुनाव के लिए बावड़ा में मतदान किया। उन्होंने लोकतंत्र में मतदान के महत्व पर जोर दिया और मतदाताओं से विकास को ध्यान में रखते हुए निडरता से भाग लेने का आग्रह किया। उन्होंने सहयोगियों की अनुपस्थिति को स्वीकार किया और मतदाता मतदान बढ़ाने की आवश्यकता पर बल दिया।

Web Title : Harshvardhan Patil and family vote in Bawda; urge voters to vote.

Web Summary : Harshvardhan Patil, with family, voted in Bawda for Zilla Parishad elections. He emphasized voting's importance in democracy and urged voters to participate fearlessly, considering development. He acknowledged colleagues' absence and stressed the need for increased voter turnout.