शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अन् जिल्हा परिषद निवडणूक एकाच दिवशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 15:56 IST

- परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी; अन्यथा विद्यार्थी मतदानापासून राहणार वंचित

पुणे : राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचाराला गती आलेली असतानाच विमान दुर्घटनेत बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयाेगाने नियाेजित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक कार्यक्रमात बदल करत मतदानाची तारीख दाेन दिवस पुढे ढकलली आहे.

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पूर्वनियाेजनानुसार ७ फेब्रुवारीला हाेणार आहे. नवीन बदलांनुसार जिल्हा परिषद निवडणूक मतदान आणि परीक्षा एकाच दिवशी येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसाेय हाेणार असून, अनेक जण मतदानापासून वंचित राहणार आहेत.

दरम्यान, विमान दुर्घटनेनंतर राज्य सरकारने एकदिवसाची सुटी आणि तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला हाेता. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयाेगाने निवडणूक कार्यक्रमात बदल केला आहे. त्याचा फटका परीक्षार्थींना बसणार आहे. अनेक विद्यार्थ्यांचे मतदान केंद्र आणि परीक्षा केंद्र दूरदूर असल्याने मतदानाचा हक्क कसा बजावणार आणि परीक्षा कशी देणार, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. मतदानाचा हक्क बजावणार कसा?

मी स्वप्निल कदम. मूळचा धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात पिंपळा खुर्द गावचा. मी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे. सदर परीक्षा ७ फेब्रुवारीला हाेणार असून, परीक्षा केंद्र मुंबई मिळाले आहे. मात्र, त्याच दिवशी माझ्या पंचायत समिती गण व जिल्हा परिषद क्षेत्रातील मतदान आहे. त्यात माझा मतदानाचा हक्क जात आहे. परीक्षा देणार की मतदानाचा हक्क बजावणार? माझ्यासारखे अनेक विद्यार्थी मतदानापासून वंचित राहत आहेत. ही गैरसाेय विचारात घेऊन सरकारने परीक्षा पुढे ढकलावी.

राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्याच्या प्रचाराला वेग आलेला असतानाचा उपमुख्यमंत्र्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. परिणामी नियाेजित ५ फेब्रुवारीला होणारे मतदान दाेन दिवस पुढे ढकलण्यात आले. त्यामुळे मतदान ७ फेब्रुवारीला होणार आहे. मात्र, त्याचं दिवशी केंद्रीय शिक्षक भरतीसाठीची परीक्षा आहे. यात विद्यार्थ्यांची हाेणारी गैरसाेय विचारात घेऊन ७ फेब्रुवारीला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी आम्ही सरकारकडे करत आहाेत.  - महेश घरबुडे, अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन 

English
हिंदी सारांश
Web Title : Teacher Eligibility Test and Zilla Parishad Election on Same Day

Web Summary : Zilla Parishad election postponed to February 7th clashes with teacher eligibility test. Students face inconvenience and potential disenfranchisement. Associations request exam postponement due to the conflict.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडexamपरीक्षाZilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६Puneपुणे