Zilla Parishad Election: जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी ५८ जणांनी घेतली माघार, अर्ज माघारीसाठी आता केवळ एक दिवस शिल्लक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 12:43 IST2026-01-25T12:42:05+5:302026-01-25T12:43:03+5:30
पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी १ हजार १२२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते.

Zilla Parishad Election: जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी ५८ जणांनी घेतली माघार, अर्ज माघारीसाठी आता केवळ एक दिवस शिल्लक
पुणे : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गेल्या दोन दिवसांत ५८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस मंगळवारी (दि. २७) आहे. रविवारी आणि सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने अर्ज माघारी घेण्यासाठी केवळ एकच दिवस शिल्लक राहिला आहे. जिल्हा परिषदेसाठी २२, तर पंचायत समितीसाठी ३६ उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत.
जिल्हा परिषदेच्या ७३ गणांसाठी एकूण ६२१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, तर पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी १ हजार १२२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते. जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या सात गणांसाठी ९५ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी आतापर्यंत ११ जणांनी अर्ज माघारी घेतले आहेत. भोर तालुक्यातून तीन उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत.
दौंड तालुक्यातून पंचायत समितीच्या १४ गणांसाठी १२७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी आतापर्यंत ११ जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. तसेच इंदापूर तालुक्यातून २०६ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ११ जणांनी अर्ज माघारी घेतले आहेत. यामुळे आता जिल्हा परिषदेसाठी ५९८, तर पंचायत समितीसाठी १ हजार ८६ उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यासाठी केवळ एकच दिवस शिल्लक आहे.