Zilla Parishad Election 2026: जिल्हा परिषदेच्या हालचालींना वेग; मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी आणि रिपाइं युतीचे उमेदवार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 15:11 IST2026-01-20T15:09:30+5:302026-01-20T15:11:07+5:30
Zilla Parishad Election 2026 उमेदवारी जाहीर होताच तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून, प्रत्येक गट व गणात जोरदार चर्चा, हालचाली, बैठका आणि प्रचाराची तयारी सुरू झाली आहे

Zilla Parishad Election 2026: जिल्हा परिषदेच्या हालचालींना वेग; मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी आणि रिपाइं युतीचे उमेदवार जाहीर
पवनानगर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी (अजित पवार) व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) युतीने सोमवारी मावळ तालुक्यातील उमेदवारांची यादी जाहीर करत रणधुमाळीला वेग दिला. उमेदवारी जाहीर होताच तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून, प्रत्येक गट व गणात जोरदार चर्चा, हालचाली, बैठका आणि प्रचाराची तयारी सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या युतीमुळे मावळ तालुक्यातील अनेक गट व गणांमध्ये लढतींचे समीकरण बदलले असून, काही ठिकाणी थेट तर काही ठिकाणी चुरशीच्या बहुरंगी लढती होणार आहेत. उर्वरित उमेदवारी जाहीर होताच प्रचाराला वेग येणार आहे.
१) टाकवे बुद्रुक जिल्हा परिषद गट
जिल्हा परिषद गट – अनंता पावशे
टाकवे बुद्रुक गण – प्राची गायकवाड
नाणे गण – आशा मोरमारे
२) इंदुरी जिल्हा परिषद गट
जिल्हा परिषद गट – पल्लवी दाभाडे
इंदुरी गण – दिलीप घारे
वराळे गण – (उमेदवारी जाहीर नाही)
३) खडकाळे जिल्हा परिषद गट
जिल्हा परिषद गट – दीपाली हुलावळे
खडकाळे गण – समीर जाधव (रिपाइं)
कार्ला गण – रेश्मा देवकर
४) कुसगाव बुद्रुक – काले जिल्हा परिषद गट
जिल्हा परिषद गट – संतोष राऊत
काले गण – शैला कालेकर
कुसगाव बुद्रुक गण – योगेश लोहार
५) सोमाटणे जिल्हा परिषद गट
जिल्हा परिषद गट – मनीषा मुऱ्हे
सोमाटणे गण – साहेबराव कारके
चांदखेड गण – सुनीता येवले
एक उमेदवारी लवकरच
राष्ट्रवादी (अजित पवार) व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युतीकडून वराळे गणातील उमेदवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. ती लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिली.