शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

कोथरुडमध्ये तरुणाची विष पिऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 10:04 PM

कोथरुडमधील शास्त्रीनगर येथे राहणाऱ्या एका तरुणाने कंपनीतून मेमो मिळाल्याच्या कारणावरुन विष पिऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे़.

ठळक मुद्देमेमो मिळाल्याच्या नैराश्यातून प्रकार केल्याचा संशय 

पुणे : कोथरुडमधील शास्त्रीनगर येथे राहणाऱ्या एका तरुणाने कंपनीतून मेमो मिळाल्याच्या कारणावरुन विष पिऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे़. अविनाशकुमार कृष्णचंद धिमन (वय ३४, रा़ दत्तनगर, शास्त्रीनगर) असे या तरुणाचे नाव आहे़. याबाबत कोथरुड पोलिसांनी सांगितले की, शास्त्रीनगरमधील दत्तनगरमध्ये एका घरातून वास येत असून आतून घर बंद आहे, अशी माहिती पोलीस नियंत्रण कक्षातून दुपारी चार वाजता कोथरुड पोलिसांना कळविण्यात आली़. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने कडी तोडून आत प्रवेश केला असता आत अविनाशकुमार हे पलंगावर पडलेले होते़. त्याच्या टेबलावर पिरंगुट येथील एका कंपनीचा मेमो पडलेला होता़. त्यात आठ दिवस कामाला न आल्याने त्यांना हा मेमो दिल्या होता़. घरात दोन तीन बाटल्या सापडल्या असून त्यावरुन त्याने विष पिऊन आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे़. याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले की, अविनाशकुमार हे मुळचे हिमाचल प्रदेश मधील राहणार आहेत़. गेल्या १७ ते १८ वर्षांपासून ते पुण्यात असून पिरंगुटमधील एका कंपनीत ते टेक्निशियन म्हणून काम करत होते़.गेल्या दोन दिवसांपासून त्यांचा कोणाशी संपर्क नव्हता़. कोथरुड पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनाला पाठविला असून त्यानंतरच मृत्युचे नेमके कारण समजू शकेल, असे पोलिसांनी सांगितले़.  

टॅग्स :PuneपुणेkothrudकोथरूडDeathमृत्यूCrimeगुन्हाPoliceपोलिस