Pune: मित्राच्या वाढदिवसाला निघालेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू; भोसे येथे कारची दुचाकीला धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 21:04 IST2023-07-14T21:03:20+5:302023-07-14T21:04:50+5:30
अपघातात प्रसादचा मृत्यू झाला असून सुदर्शनला गंभीर दुखापत झाली आहे...

Pune: मित्राच्या वाढदिवसाला निघालेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू; भोसे येथे कारची दुचाकीला धडक
शेलपिंपळगाव (पुणे) : चाकण - शिक्रापूर राज्य महामार्गावर कारची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेला मित्र गंभीर जखमी झाला. सदरची घटना भोसे (ता. खेड) गावच्या हद्दीतील राजनंदिनी हॉटेलजवळ मंगळवारी (दि.११) रात्री अकराच्या सुमारास घडली.
प्रसाद संभाजी सुरवसे (वय १९ रा. आण्णासाहेब मगर वस्ती, मगरपट्टा, हडपसर) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. तर पाठीमागे बसलेला प्रसादाचा मित्र सुदर्शन योगेश जाधव (वय २१) हा जखमी झाला आहे. याप्रकरणी शिवाजी गणपत सुरवसे (वय ४२) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद सुरवसे व सुदर्शन जाधव हे दोघेजण दुचाकीवरून (एमएच १४ डीडी ६४१३) आपल्या मित्राच्या वाढदिवसाला जात होते. मात्र भोसे हद्दीत समोरून भरधाव येणाऱ्या इको चारचाकी वाहनाने (एमएच १४ सीएक्स ५८४४) दुचाकीला धडक दिली. अपघातात प्रसादचा मृत्यू झाला असून सुदर्शनला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी कारचालक दिनेश नारायण गोसाळकर (वय ५१ रा. वाडा ता.खेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यास अटक केली आहे.