शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
5
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
6
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
7
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
8
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
9
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
10
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
11
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
12
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
13
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
14
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
15
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
16
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
17
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
20
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल

दोन हजार रुपयांसाठी अपहरण करून तरुणाचा खून; दोघांना जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 11:55 IST

- दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागेल, असेही नमूद केले आहे.

पुणे : रस्त्यावरून जात असताना दुचाकीला आडवा आल्याने दुचाकीचे नुकसान झाल्याचा बहाणा करून तरुणाचे अपहरण करीत नातेवाइकांकडे दोन हजारांची मागणी करूनही पैसे न दिल्याने तरुणाचा खून करणाऱ्या दोघांना न्यायालयाने जन्मठेपेसह सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या गुन्ह्यात तब्बल ४० जणांची साक्ष नोंदविण्यात आली.

सत्र न्यायाधीश जे. जी. डोरले यांनी हा निकाल दिला. सुमित ऊर्फ सोन्या सुधीर काळे व अक्षय ऊर्फ भीमा बाळू दिवटे अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागेल, असेही नमूद केले आहे. ही घटना १८ मार्च २०१७ रोजी सकाळी आठच्या सुमारास घडली.रामअवतार बनवारीलाल जाटव (वय १९) असे मृत युवकाचे नाव आहे. मूळचा मध्य प्रदेशचा असलेला जाटव पुण्यात बांधकाम ठिकाणी फरशी बसविण्याचे काम करीत होता. घटनेच्या दिवशी आरोपी त्यांच्या दुचाकीवरून मार्केटयार्ड येथे जात होते. यावेळी रामअवतार हा रस्त्यात आडवा आल्याने दोन्ही आरोपी रस्त्यावर खाली पडले. याबाबत त्यांनी रामअवतारकडे नुकसान भरपाईची मागणी केली. यादरम्यान, त्यांनी त्याला दुचाकीवर जबरदस्तीने बसवून वनशिव वस्ती येथील मोकळ्या जागेत नेत त्याच्या नातेवाइकांशी संपर्क साधत रामअवतार याला सोडण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी केली. पैसे न मिळाल्याच्या कारणावरून त्यांनी संगनमत करत रामअवतार याचा दोरीने गळा आवळून व त्याच्या डोक्यात दगड घालून खून करत दोघे पसार झाले होते.याप्रकरणी, पोलिसांनी आरोपींना अटक करत त्यांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील वामन कोळी यांनी कामकाज पाहिले. युक्तिवादादरम्यान, त्यांनी व्हॉइस सॅम्पल, मोबाइल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज आदी पुरावे कोर्टापुढे सादर केले. न्यायालयाने सरकार पक्षासह बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत शिक्षा सुनावली. सरकार पक्षास न्यायालयीन कामकाजास हवालदार गणेश तेळकर यांनी सहकार्य केले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCourtन्यायालय