Pune: खासगी सावकारांच्या तगाद्यामुळे तरुणाने संपवले जीवन, दाेन जणांविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 09:19 IST2024-01-01T09:19:28+5:302024-01-01T09:19:50+5:30
दीपक चंपालाल राजपुरोहित ( वय २५, रा. साईकृपा सोसायटी, सोमवार पेठ ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे...

Pune: खासगी सावकारांच्या तगाद्यामुळे तरुणाने संपवले जीवन, दाेन जणांविरुद्ध गुन्हा
पुणे : खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार पेठेत घडली. तरुणाला धमकावून त्याला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
दीपक चंपालाल राजपुरोहित ( वय २५, रा. साईकृपा सोसायटी, सोमवार पेठ ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत दीपकचे वडील चंपालाल राजपुरोहित यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दीपक याने बेकायदा सावकारी करणाऱ्या काहीजणांकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्याची परतफेड न केल्याने त्यांनी त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांच्या धमकावण्यामुळे मानसिक त्रास होऊन सोमवार पेठेतील घरी १५ डिसेंबर रोजी दीपक याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
सुरुवातीला समर्थ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक ज्योती कुटे तपास करत आहेत.