Pune: मोटारीचा फुटबॉल गाळातून बाहेर काढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 18:20 IST2023-07-12T18:20:48+5:302023-07-12T18:20:59+5:30

ही घटना न्हावी सांडस गावानजीक नदीपात्रात घडली...

Youth drowns in river after trying to retrieve football from silt pune latest news | Pune: मोटारीचा फुटबॉल गाळातून बाहेर काढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू

Pune: मोटारीचा फुटबॉल गाळातून बाहेर काढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू

पुणे : नदीपात्रातील मोटारीचा फुटबॉल गाळातून बाहेर काढण्यासाठी पाण्यात उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना न्हावी सांडस गावानजीक नदीपात्रात घडली. अमोल सुभाष शितोळे (वय ३६) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या आई मंदाकिनी सुभाष शितोळे यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संबंधित प्रकाश कोतवाल (रा. जगतापवाडी, अष्टापूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा अमोल याला प्रकाश कोतवाल यांनी नदीपात्रातील मोटरीचा फुटबॉल बाहेर काढण्यासाठी घेऊन गेले. अमोल पाण्यात उतरला होता. मात्र, पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, प्रकाश यांनी अमोल याला सुरक्षिततेची साधने न पुरविल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला, अशी फिर्यादी त्याच्या आईने दिली. त्यानुसार पाेलिसांनी गुन्हा नाेंदवला आहे.

Web Title: Youth drowns in river after trying to retrieve football from silt pune latest news