PMPML| पुण्यात पीएमपीएलच्या धडकेने तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 15:24 IST2022-07-27T15:17:09+5:302022-07-27T15:24:37+5:30
बसच्या धडकेत तरूणाचा मृत्यू

PMPML| पुण्यात पीएमपीएलच्या धडकेने तरुणाचा मृत्यू
पुणे : शहरात दुचाकीवरील तरुणाला पीएमटी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला आहे. आकाश विल्सन पिल्ले (31, रा. येरवडा गाडीतळ) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीएमटी बस चालक अजय कामठे (रा. उरळी कांचन ) याच्या विरोधात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा अपघात डेक्कन कॉलेज जवळील चंद्रमा चौकात मंगळवारी रात्री घडला. पीएमटी बस (एमएच 12, आर एन 9076) आळंदीहून स्वारगेटला जात होती. या दरम्यान, दुचाकी वरून आकाश जात असताना पीएमटीने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपाचारासाठी ससून रुग्णालयात नेले असता उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.