शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Pune| शिक्रापूरजवळ दुचाकीसह पुलावरून कोसळून युवकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 10:35 IST

याबाबत शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे

शिक्रापूर (पुणे): पुणे-नगर रोड जवळील शिक्रापूर येथील बजरंगवाडी येथील रस्त्याने पुण्याकडून अहमदनगरकडे जात असताना रात्रीच्या सुमारास एक युवक दुचाकीसह पुलाच्या खाली कोसळला. त्यात त्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. किरण दिगंबर पाटील असे या घटनेत मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील बजरंगवाडी येथील रस्त्याने पुण्याकडून अहमदनगरकडे जात असताना रात्रीच्या सुमारास एक युवक दुचाकीसह पुलाच्या खाली कोसळला असल्याचे पाठीमागून आलेल्या नागरिकांना दिसले. याबाबत माहिती मिळताच शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस व काही ग्रामस्थ यांनी सदर ठिकाणी जात पहाणी केली. विजेची व्यवस्था करत ओढ्याच्या पाण्यामध्ये पडलेल्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाण्यामध्ये पडलेली दुचाकी बाहेर काढण्यात यश आले. मात्र, पाण्यामध्ये पडलेल्या व्यक्तीचा पाण्याची खोली व त्यामधील गाळ यामुळे शोध लागत नव्हता.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील अग्निशमक दलाच्या जवानांनी येथे धाव घेतली. याबाबत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे अग्निशमन अधिकारी विजय महाजन, रांजणगाव ओद्योगिक वसाहतीतील अग्निशमन अधिकारी वैभव तांडे, जवान अक्षय नेवसे, शुभम यादव, संदीप तांबे, सचिन पिसाळ, भाऊसाहेब बागुल, मयूर गोसावी, अक्षय बागल यांसह आदींनी पाण्यामध्ये पडलेल्या व्यक्तीला बाहेर काढले. त्यावेळी त्याचे नाव किरणकुमार दिगंबर पाटील (वय ४२ वर्षे रा. दत्तनगर चाकण रोड शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. मरवाडी ता. नायगाव जि. नांदेड) असल्याचे समोर आले.

टॅग्स :PuneपुणेShikrapurशिक्रापूरAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस