शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यावरुन ट्रकचे चाक गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 13:22 IST

ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कारच्या चालकाने दुचाकीच्या हॅन्डलला धडक दिली. यामुळे दुचाकीसह तरूण रस्त्यावर पडला. याचवेळी अवजड ट्रकच्या चाकाखाली तो आल्याने जागीच मृत्यूमुखी पडला.

ठळक मुद्दे इंडिका व ट्रक वरील अज्ञात चालक फरार

लोणी काळभोर : पुणे - सासवड राज्यमार्गावर कामावरून दुचाकीवर घरी परतत असलेल्या इंजिनियर तरुणाच्या दुचाकीला चारचाकीची धडक दिली. त्यामुळे इंंजिनिअर तरुण रस्त्यावर पडला. याचवेळी मागून आलेल्या अवजड ट्रकचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने हा तरूण जागीच मृत्यूमुखी पडला. ही दुर्दैवी घटना सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.   वैभव नंदकुमार ऊबाळे ( वय २८, रा. हाडको, सासवड, ता. पुरंदर ) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मयत तरुणाचा मोठा भाऊ विक्रम नंदकुमार ऊबाळे याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अज्ञात वाहनचालकांवर गुन्हा दाखल केला आहे.    पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडूभैरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव हा होळकरवाडी ( ता. हवेली ) येथील कॉन्सुल निओव्हॅट या कंपनीत इंजिनियर म्हणून कार्यरत होता. तो कामावर ये - जा  करण्यासाठी दुचाकीचा वापर करत असत. घटनेच्या दिवशी वैभव हा क्रमांक (एमएच १२ केएम ६१०६) या गाडीवरुन घरी येत असताना मागील बाजूने भरधाव वेगाने आलेल्या इंडिका (क्र.एमएच. १२. केएन. ८७१९)कारच्या चालकाने  ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीच्या हॅन्डलला धडक दिली. यामुळे वैभव दुचाकीसह रस्त्यावर पडला. याचवेळी हडपसर कडून सासवड कडे निघालेला अवजड ट्रक(एमएच १२ सीटी ८६६१ )या ट्रकच्या चाकाखाली वैभव आल्याने तो जागीच मृत्यूमुखी पडला. या घटनेस कारणीभूत असलेले इंडिका व ट्रक वरील अज्ञात चालक तेथे न थांबता आपापली वाहने घेऊन निघून गेले. परंतू दोन्ही वाहनांचे क्रमांक मिळाले असल्याने त्यांच्यापर्यंत पोहचणे अवघड नसल्याचे पोलीसांनी सांगितले. या गुन्ह्याचा पुढील तपास लोणीकाळभोर पोलीस करत आहे.  

टॅग्स :PurandarपुरंदरAccidentअपघातDeathमृत्यूCrimeगुन्हाPoliceपोलिस