पुणे : काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी) बजावलेल्या नोटिसीच्या विरोधात केंद्र सरकारचा निषेध म्हणून युवक काँग्रेसनेलोणावळा-पुणे लोकल थांबवून धरली.भारतीय जनता पक्षाने काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाला लक्ष्य केले आहे. जनमानसातील त्यांची प्रतिमा खराब करण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. त्यासाठी सरकारी यंत्रणाचा गैरवापर करण्यात येत आहे, अशी टीका राज्य कार्याध्यक्ष शिवराज मोरे यांनी केली. सरचिटणीस अक्षय जैन यांनी भाजपची ही मनमानी युवक काँग्रेस खपवून घेणार नाही, लोकशाहीवरील या हल्ल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेस रस्त्यावरून उतरून लढा देईल असे सांगितले.
प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे, शहराध्यक्ष सौरभ अमराळे, तारीक बागवान, प्रवीण बिरादार, महेश म्हेत्रे, कौस्तुभ नवले, चैतन्य जायभाये, मतीन शेख, विक्रांत धोत्रे, राहुल शिंदे, अक्षय बहिरट, मुरली बुद्रराम, हर्षद हांडे आंदोलनात सहभागी झाले होते.