शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

भाजप शहराध्यक्षांची वीज चोरीवरून युवक काँग्रेस आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 15:43 IST

- कारवाईची मागणी वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर आंदोलन

पुणे: भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी त्यांच्या जुन्या निवासस्थानी असलेल्या महापालिका क़ॉलनीमधील व्यायामशाळेला चोरून वीज घेतल्याच्या प्रकरणावरून आक्रमक झालेल्या युवक काँग्रेसने शुक्रवारी सकाळी वीज वितरण कंपनीच्या रास्ता पेठ कार्यालयासमोर आंदोलन केले. पोलिसांनी त्वरीत त्यांना ताब्यात घेतले व तासाभरानंतर समज देऊन सोडून दिले.

युवक काग्रेसचे शहराध्यक्ष सौरभ अमराळे तसेच राज्य पदाधिकारी अक्षय जैन, प्रथमेश आबनावे व अन्य अनेक कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. धीरज घाटे यांनी त्यांच्या व्यायामशाळेला चोरून वीज वापरली असल्याचा आरोप आहे. यासंदर्भात वीज वितरण कंपनीने त्यांना दंड ठोठावला आहे. जैन यांनी सांगितले की १२ वर्षे वीज चोरली जात असताना दंड मात्र एकाच वर्षाचा आहे.

यात राजकीय हस्तक्षेप होत आहे. घाटे यांच्यावर कसलीही कारवाई झालेली नाही. १२ वर्षांचा दंड वसूल करणे गरजेचे आहे. असे असताना त्यांना वाचवण्याचा प्रयत्न भाजपच्या बड्या राजकीय धेंडांकडून केला जात आहे. आमचे आंदोलन त्याविरोधात आहे. यासंदर्भात वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली, त्यांना निवेदन दिले. कारवाईची मागणी केली, मात्र त्यांच्याकडून कसलीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला.

कार्यकर्त्यांनी एकत्र जमून रस्त्यावरच ठाण मांडले. घोषणा देत परिसर दणाणून सोडला. समर्थ पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी त्यांना अटकाव केला, मात्र रस्त्यावरून उठण्याच्या मनस्थितीत कार्यकर्ते नव्हते. पोलिसांनी सगळ्यांना धरून गाडीत बसवले. जैन, आबनावे, अमराळे, किशोर मारणे, उमेश पवार, आनंद कुमार दुबे, मेघशाम धर्मावत, राज जाधव, हर्षद हांडे, अक्षय बहिरट, सद्दाम शेख,ऋषीकेश विरकर, ऋतिक शिंदे, मतीन शेख, अनिरूद्ध जगदाळे तसेच अन्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी गाडीत बसवले व समर्थ पोलिस ठाण्यात आले. तिथे त्यांना तासभर बसवून ठेवण्यात आले. त्यानंतर समज देऊन सोडून देण्यात आले. आम्ही हा विषय अर्धवट सोडणार नाही तर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून कारवाई करायला लावणार आहोत, कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रियाही आम्ही सुरू केली आहे असे जैन यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcongressकाँग्रेसBJPभाजपा