Pune Crime| ऑनलाईन रमीच्या व्यसनातून पैसे हरल्याने युवकाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 21:40 IST2022-08-17T21:37:21+5:302022-08-17T21:40:01+5:30
झाडाला लटकलेल्या अवस्थेत या युवकाचा मृतदेह आढळून आला....

Pune Crime| ऑनलाईन रमीच्या व्यसनातून पैसे हरल्याने युवकाची आत्महत्या
राजगुरूनगर : मोबाईलवर ऑनलाईन रमी खेळण्याचे व्यसन लागल्याने आणि त्यातून मोठी रक्कम हरल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या युवकाने नैराश्येतून आत्महत्या केली. ही घटना राजगुरुनगर येथे घडली. शेखर रमेश सुक्रे (वय २२, रा. ब्राह्मणआळी, राजगुरूनगर ) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शेखर सुक्रे हा ३१ जुलै रोजी घरातून निघून गेला होता. पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रारही दाखल झाली होती. मंगळवारी राजगुरूनगर परिसरातील निर्जनस्थळी झाडाला लटकलेल्या अवस्थेत या युवकाचा मृतदेह आढळून आला.
सुक्रे याला मोबाईलद्वारे ऑनलाईन रमी खेळण्याचा व्यसन असल्याची माहिती पोलिसांनी दिली त्यातूनच तो कर्जबाजारी झाला होता. नैराश्येतून त्याने आत्महत्या केली असावी असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. याबाबत मयत युवकाचा भाऊ याने खेड पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. या घटनेचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.