शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी तरुणांचा 'हेल्पिंग हॅन्ड'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 17:46 IST

मराठवाड्यातून पुण्यात शिक्षणासाठी अालेल्या विद्यार्थ्यांना सध्य अनेक अडचणींचा सामना करावा लागत अाहे. त्यांच्या मदतीला अाता हेल्पिंग हॅन्ड ही संस्था पुढे अाली अाहे.

- राहुल गायकवाड 

पुणे : शिक्षणासाठी महाराष्ट्रातील विविध भागांमधून लाखाे विद्यार्थी पुण्यात येत असतात. यातही मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची संख्या एकूण विद्यार्थ्यांच्या 40 टक्केहून अधिक अाहे. एकीकडे मराठवाड्यात भीषण दुष्काळ असताना पुण्यात शिक्षणासाठी पाठवलेल्या मुलांना पैसे पाठविणे त्यांच्या पालकांसाठी अवघड झाले अाहे. परिणामी पुण्यात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अर्धपाेटीच रहावे लागत अाहे. अशा विद्यार्थ्यांच्या मदतीला अाता दुष्काळी भागातले तरुणच पुढे अाले अाहेत. या तरुणांनी हेल्पिंग हॅन्ड ही संस्था सुरु केली असून या माध्यमातून मुलांच्या मेससाठी स्पाॅन्सर मिळविण्याचा काम करण्यात येत अाहे. 

    2015 नंतर पुन्हा एकदा माेठा दुष्काळ मराठवाड्यात पाहायला मिळत अाहे. पाऊसच पडला नसल्याने पिकं करपून गेली. घाेटभर पाण्यासाठी कित्येक किलाेमीटर वणवण भटकावे लागत अाहे. मराठवाड्यात शिक्षणाच्या, राेजगाराच्या संधी नसल्याने तरुणांची पाऊले पुण्याकडे वळतात. सध्या मराठवाड्यातील विद्यार्थी संख्या ही पुण्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी संख्येच्या 40 टक्के इतकी अाहे. निसर्गाने दाखवलेली अवकृपा अाणि गरिबी यांमुळे मराठवाड्यात भीषण परिस्थिती अाहे. अापण जे साेसलं ते अापल्या मुलांना साेसावं लागू नये, त्यांनी शिकून अधिकारी व्हावं या अाशेने अनेक पालक अापल्या मुलांना पुण्यात शिक्षणासाठी पाठवत असतात. परंतु पुण्यात अाल्यानंतरही या विद्यार्थ्यांच्या मागचा संघर्ष संपत नाही. मेससाठी पैसे नसल्याने सध्या मराठवाड्यातील अनेक विद्यार्थ्यांना अर्धपाेटी रहावं लागत अाहे. त्यातच पुण्यासारख्या शहरात राहताना खर्च वाढत असल्याने या विद्यार्थ्यांच्या समाेर जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला अाहे. 

    यातच स्वतः दुष्काळाच्या झळा साेसलेला अाणि मराठवाड्यातून शिक्षणासाठी पुण्यात अालेल्या कुलदीप अांबेकर या तरुणाने मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी  हेल्पिंग हॅन्ड ही संस्था नुकताच  सुरु केली अाहे. या संस्थेच्या माध्यमातून स्पाॅन्सर्स शाेधून या विद्यार्थ्यांच्या मेसचा खर्च भागविण्यात येत अाहे. 2015 पासून कुलदीप मराठवाड्यातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर अावाज उठवत अाहे. त्याला मराठवाडा अाणि दुष्काळी भागातील असलेल्या इतर तरुणांची साथ मिळाली. संध्या साेनवणे, ईश्वर तांबे, दयानंद शिंदे, लक्ष्मण जगताप, रचना परदेशी हे तरुण कुलदीप साेबत इकत्र येत मराठवाड्यातील तरुणांच्या मदतीला धावून अाले अाहेत. नुकताच या तरुणांनी दुष्काळग्रस्त विद्यार्थी परिषद भरवली हाेती. या परिषदेत मराठवाड्यातील अनेक विद्यार्थ्यांनी अापल्या व्यथा मांडल्या. 

    कुलदीप म्हणाला, मी स्वतः मराठवाड्यातील अाहे. 2015 साली माझ्याकडे विद्यापीठाचे परीक्षा फी भरण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे मला लेट फी भरावी लागली. दुष्काळग्रस्तांची फी माफ करण्यात येेईल असे सरकारने जाहीर केले हाेते, प्रत्यक्षात तशी कृती हाेत नव्हती. या विराेधात मी अावाज उठवला. पाहता पाहता मला हजाराे विद्यार्थ्यांची साथ मिळाली. अाम्ही विद्यापीठात माेर्चा काढून 5 काेटी रुपयांचे शुल्क माफ करण्यास विद्यापीठाला भाग पाडले. येथूनच या चळवळीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. अाम्ही सुरुवातीला काही स्पाॅन्सर्सच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे मेसचे पैसे भरले. या चळवळीला व्यापक स्वरुप देण्यासाठी अाम्ही हेल्पिंग हॅन्ड संस्थेची स्थापना केली. सध्या अाम्ही शेकडाे विद्यार्थ्यांना मदत करत अाहाेत. अाम्हाला अाता मदतीचा अाेघ देखिल वाढताेय. 

     संध्या म्हणाली, मी सुद्धा दुष्काळी भागातून पुण्यात शिक्षणासाठी अाले. महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करताना मराठवाड्यातील अनेक विद्यार्थ्यांच्या करुण कहाण्या कानावर पडल्या. अापल्या बांधवांसाठी काहीतरी केले पाहिजे असा विचार सुरु असताना कुलदीप करत असलेल्या कार्याची माहिती मिळाली. या सामाजिक कार्यात अाम्ही एकत्र काम करण्यास सुरुवात केली. मराठवाड्यात यंदा देखिल भीषण दुष्काळ अाहे. पुण्यात शिक्षणासाठी अालेल्या विद्यार्थ्यांचे जेवणाचे हाल हाेत अाहेत. अक्षरक्षः वडापाववर अनेक विद्यार्थी दिवस काढत अाहेत. मराठावाड्यातील बहुतांश विद्यार्थ्यांचे पालक हे शेती करतात. पिके करपल्याने यंदा उत्पादन झाले नाही. त्यामुळे पालक पुण्यात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना पैसे पाठवू शकत नाहीत. पुण्यात राहताना या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत अाहे. हेल्पिंग हॅन्डच्या माध्यमातून अाम्ही या विद्यार्थ्यांचं थाेडसं का हाेईना अाेझं कमी करण्याचा प्रयत्न करत अाहाेत. 

    मराठवाड्यातील या विद्यार्थ्यांना नागरीकांनी मदत करावी असे अावाहन हेल्पिंग हॅन्डच्या वतीने करण्यात अाले अाहे. 

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाStudentविद्यार्थीfoodअन्न