महिला दिनादिवशीच कासुर्डीत युवतीची आत्महत्या; पुणे जिल्ह्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 18:03 IST2023-03-09T18:02:52+5:302023-03-09T18:03:29+5:30
सकृतदर्शनी ही घटना आत्महत्याच असल्याचे आढळून आल्याची माहिती यवत पोलिसांनी दिली...

महिला दिनादिवशीच कासुर्डीत युवतीची आत्महत्या; पुणे जिल्ह्यातील घटना
यवत (पुणे) : जागतिक महिला दिनादिवशीच कासुर्डी (ता. दौंड) येथे एका युवतीने राहत्या घरी साडीच्या साह्याने फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. सकृतदर्शनी ही घटना आत्महत्याच असल्याचे आढळून आल्याची माहिती यवत पोलिसांनी दिली आहे.
बुधवार (दि. ८) रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्यापूर्वी पूनम बाळासोा टेकवडेने (वय २२) तिच्या राहत्या घरी पत्र्याच्या लोखंडी अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची खबर लक्ष्मण बजाबा खेनट यांनी यवत पोलिसांकडे दिली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवलदार करचे करत आहेत.