विवाहित तरुणाकडून फसवणूक झाल्याने तरुणीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 10:42 IST2023-04-29T10:37:31+5:302023-04-29T10:42:19+5:30
ही घटना कात्रज भागातील आंबेगाव बुद्रुक भागात घडली...

विवाहित तरुणाकडून फसवणूक झाल्याने तरुणीची आत्महत्या
पुणे : पत्नीसोबत पटत नसल्याची बतावणी करून एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिची विवाहित तरुणाने फसवणूक केली. विवाहित तरुण आणि त्याच्या पत्नीला झालेल्या त्रासामुळे तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कात्रज भागातील आंबेगाव बुद्रुक भागात घडली.
या प्रकरणी चंदन तेजवाणी आणि त्याची पत्नी लता तेजवाणी (दोघे रा. निगडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरभी सचिन जगताप असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. आरोपी चंदन विवाहित आहे. तीन वर्षांपूर्वी त्याची तरुणीशी ओळख झाली.
त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मात्र पती-पत्नीकडून झालेली मारहाण आणि झालेला मनस्ताप यामुळे सुरभीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अंकुश कर्चे करत आहेत.