शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाला दगड मारून आणि कोयत्याने वार करुन माजवली दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 20:12 IST

नागरिकांमध्ये निर्माण झाले भीतीचे वातावरण

ठळक मुद्देसमजूत काढण्यावरून केली मारहाण

पिंपरी : भांडणात समजूत काढणाऱ्या तरुणाला दगडाने व कोयत्याने वार करून मारहाण केली. तसेच टोळक्याने आरडाओरडा करून दहशत निर्माण केली. काळेवाडी फाटा येथील पुलाखाली गुरुवारी (दि. १८) रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे.

किरण उत्तम लोंढे (वय २६, रा. काळेवाडी) यांनी या प्रकरणी शुक्रवारी  वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अशोक मुकुंद मोरे (वय १८  रा. बिड), अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. चेतन साळवी, तसेच आरोपी अशोक मोरे याचे इतर दोन साथीदार यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लोंढे यांचा ट्रॅव्हल्स बसचा व्यवसाय आहे. त्यांच्या बसवर काम करणारा ज्ञानेश्वर सगर हा प्रवाशांना बसमध्ये बसवत असताना आरोपी चेतन साळवी हा दरवाजा मध्ये उभा राहिला होता. ज्ञानेश्वर सगर याने त्याला दरवाज्यातून बाजूला उभे राहण्यास सांगितले. चेतन याला त्याचा राग आला. त्यातून त्याने ज्ञानेश्वर याला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. त्यामुळे फिर्यादी लोंढे हे चैतन्याची समजूत काढत होते. त्यावेळी आरोपी चैतन याने त्याच्या मित्रांना फोन करून बोलावून घेतले. दुचाकीवरून आलेल्या तिघांनी कोयते हातात घेऊन फिर्यादीच्या जवळ येऊन रस्त्यावर पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या पायावर मारला. तसेच कोयत्याने वार केल्याने फिर्यादी लोंढे जखमी झाले. तसेच आरोपींनी लोंढे यांना शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. रस्त्यावर पडलेले दगड उचलून फिर्यादीचा मावस भाऊ सचिन पावडे याच्या डोक्यावर दगडाने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर आरडाओरडा करून दहशत निर्माण करून आरोपी दुचाकीवरून निघून गेले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक