Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावरील सरडेवाडी टोलनाक्यानजीक तरुणाचा दगडाने ठेचून खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 21:39 IST2023-07-12T21:35:05+5:302023-07-12T21:39:41+5:30
तरुणाचा मृतदेह दगडाने ठेचून खून केल्याच्या अवस्थेत आढळून आला...

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावरील सरडेवाडी टोलनाक्यानजीक तरुणाचा दगडाने ठेचून खून
बाभूळगाव (पुणे) :पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी टोलनाक्यानजीक उसाच्या शेतात प्रदीप रघुनाथ पवार (वय ३७ वर्ष, रा. रामतीर्थ तांडा, जळकोट ता. नळदुर्ग, जि.धाराशिव) या तरुणाचा मृतदेह दगडाने ठेचून खून केल्याच्या अवस्थेत आढळून आला.
बुधवारी सकाळी बापूराव सहदेव सिद यांच्या निदर्शनास आल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने इंदापूर पोलिसांना या घटनेची खबर देण्यात आली. इंदापूर ठाण्याचे सहा. पोलिस निरीक्षक प्रकाश पवार, योगेश लंगोटे, सहा. फौजदार युवराज कदम, पो. काॅ. विनोद लोखंडे, सागर चौधर यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मयत इसमाचा मृतदेह इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. अधिक तपास इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रकाश पवार करीत आहेत.