शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

हडपसरमध्ये भरदिवसा तरुणाच्या गळ्यावर वार; व्यवसायात गुंतविलेल्या ३० लाखांचा मागितला होता मोबदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 14:17 IST

हडपसर पोलिसांकडून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला अटक

पुणे : जेएनपीटी येथून कस्टमचा माल आणून त्याची विक्री करण्याच्या व्यवसायात गुंतविलेल्या ३० लाख रुपयांचा मोबदला मागितल्याने चिडून मित्राच्या गळ्यावर वार करुन त्याचा खुन करणार्‍या प्रयत्न केल्याची घटना हडपसर येथील रवीदर्शनमधील रस्त्यावर भरदिवसा घडली.  

हडपसर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन सचिन दिलीप होले (वय ३४, रा. ससाणेनगर, हडपसर) याला अटक केली आहे. याप्रकरणी शादाब अमानुल्ला शेख (वय ३६, रा. सय्यदनगर, महम्मदवाडी रोड, हडपसर) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार हडपसरमधील रवीदर्शन सिग्नल ते एम कॉलेजकडे जाणार्‍या रस्त्यावर शनिवारी सकाळी पावणेअकरा वाजता घडला. 

शादाब शेख आणि सचिन होले हे दोघे मित्र आहेत. होले याने शेख व त्यांच्या मित्रांना आपण जेएनपीटी कस्टम येथून माल घेऊन त्यांची विक्री करु. जो काही नफा होईल, ते सगळे मिळून वाटून घेऊ, असे सांगितले. त्याने शेख व त्यांच्या मित्रांकडून २९ लाख ९० हजार रुपये घेतले. मात्र, त्याचा कोणत्याही प्रकारचा मोबदला दिला नाही. तेव्हा शेख यांनी होले यांच्याकडे त्यांनी गुंतविलेले पैसे परत मागितले.

तेव्हा होले याने त्यांना मेसेज करुन सय्यदनगर रेल्वेगेटजवळ शनिवारी सकाळी बोलविले. त्यानुसार शेख हे तेथे सकाळी पावणेअकरा वाजता गेले. तेथून त्यांना रवीदर्शन येथे नेऊन त्यांच्या गळ्यावर चाकूने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात शेख हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक पडसळकर तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकDeathमृत्यू