शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गाडीचा धक्का लागल्याने तरुणाने लगावली कानशिलात; १७ वर्षीय मुलाने दगड मारून केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 10:44 IST

तरुणाने अल्पवयीन मुलाच्या कानशिलात लगावली या रागातून अल्पवयीन मुलाने दगड मारून जखमी करून तरुणाला मारहाण केली

पिंपरी : अल्पवयीन मुले चालवित असलेल्या दुचाकीचा तरुणाला धक्का लागला. त्यामुळे तरुणाने अल्पवयीन मुलाच्या कानशिलात लगावली. या रागातून अल्पवयीन मुलाने दगड मारून जखमी करून तरुणाला मारहाण केली. यात तरुणाचा मृत्यू झाला. जाधववाडी, चिखली येथे शुक्रवारी (दि. ३१) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास ही घटना घडली. अल्पवयीन मुले चालवित असलेल्या दुचाकीमुळे या गुन्ह्याचा छडा लागला.

सुनील शिवाजी सगर (वय ३५, रा. जाधववाडी, चिखली), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांच्या २५ वर्षीय पत्नीने शनिवारी (दि. १) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार एका १७ वर्षीय व एका १४ वर्षीय अशा दोन अल्पवयीन मुलांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी सुनील सगर हे कामावरून घरी येत होते. ते जाधववाडी, चिखली येथे आले असता आरोपींनी अज्ञात कारणासाठी त्यांना मारहाण केली. यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा चिखली पोलिसांनी तपास सुरू केला. अल्पवयीन मुलांनी गुन्हा करताना वापरलेल्या दुचाकीबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गाडीमालकाकडे चौकशी केली. शुक्रवारी (दि. ३१) सायंकाळी दुचाकी कोण चालवित होता, याबाबत पोलिसांनी गाडीमालकाकडे विचारणा केली. गाडीमालकाच्या मुलाच्या दोन मित्रांनी गाडीची मागणी केली. मित्राला भेटायला चिखली येथे जायचे आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे गाडीमालकाच्या मुलाने त्याच्या मित्रांना दुचाकी दिली. त्यानुसार पोलीस गाडीमालकाच्या मुलाच्या मित्रांच्या घरी गेले. ते दोघेही घरी मिळून आले. 

दुकानातून बाहेर काढून मारहाण

दोन्ही अल्पवयीन मुले दुचाकी घेऊन मित्राकडे जात होते. त्यावेळी जाधववाडी, चिखली येथे सुनील सगर यांना दुचाकीचा धक्का लागला. त्यामुळे सगर यांनी दुचाकीवरील अल्पवयीन मुलांपैकी एकाच्या कानशिलात लगावली. याचा राग आल्याने अल्पवयीन मुलांनी सुनील यांना मारहाण केली. त्यामुळे सुनील हे त्यांच्या तावडीतून सुटून पळत-पळत एका किराणा दुकानात घुसले. अल्पवयीन मुलांनी दुचाकीवरून त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने सुनील यांना दुकानाबाहेर ओढून काढले. दोन्ही अल्पवयीन मुलांनी सुनील यांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली. 

डोक्यात घातला दगड

दुकानाबाहेर सुनील यांना मारहाण करताना १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने तेथे पडलेला दगड उचलला. तो दगड दोन ते तीन वेळा डोक्यात मारल्याने सुनील हे गंभीर जखमी झाले. त्यामुळे सुनील हे खाली पडले. त्यानंतर त्यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. त्यावेळी तेथे लोकांची गर्दी झाल्याने अल्पवयीन मुले घाबरून गाडी घेऊन तेथून निघून गेले. त्यानंतर त्यांनी मित्राला दुचाकी परत केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूbikeबाईकcarकार