शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या अवघ्या ६ दिवसानंतर तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; पत्नीला मानसिक धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 17:08 IST

पत्नीची मानसिक अवस्था खूपच वेदनादायी असून तिला पुढील आयुष्य जगण्याचा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे.

माळेगाव : लग्न म्हंटलं घरात आनंदाचा व उत्साहाचं वातावरण असते असंच वातावरण माळेगाव मधील माळेगाव कारखान्याचे निवृत्त कर्मचारी अनिल पांडुरंग येळे यांच्या घरी त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने होते. लग्न समारंभाच्या निमित्ताने नातेवाईक व मित्रपरिवारच्या साक्षीने शनिवार दिनांक 19 रोजी दुपारी लग्न समारंभ पार पडला. सगळं कसं या नव दाम्पत्याने पाहिलेल्या स्वप्नांप्रमाणे चालू होतं. परंतु नियतीच्या मनात काही वेगळे चालू होतं आणि गुरुवारी पहाटे नवरा मुलगा सचिन उर्फ बबलू अनिल येळे (वय 25 रा माळेगाव) याचा याला पहाटे एक वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटका आला 

यानंतर नातेवाईकांनी त्वरित बारामती येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी नवरा मुलगा सचिन मृत पावल्याचे सांगितले. ही बातमी माळेगाव परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि एकच खळबळ उडाली. सर्वांची मने सुन्न झाली. सचिनच्या घराकडे नातेवाईकांचा व मित्रपरिवाराचे लोंढेच्या लोंढे येऊ लागले. सचिनचा मृतदेह ज्या मंडपात सत्यनारायणाची पूजा घातलेली होती. त्याच मंडपात  अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला. यावेळी सचिनच्या आई-वडिलांसह नातेवाईकांचा मित्रपरिवारचा व हर्षदाचा आक्रोश उपस्थिथांचे यांचे हृदय पिळवटून टाकणारा होता. यावेळी नवरी मुलगी हर्षदाचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. हर्षदाच्या हातामधील चुडा-मेहंदी व अंगावरील हळद तशीच होती नऊ संसाराचे स्वप्न पाहिलेला या नवोदम्पत्यांमधील सचिनच्या मृत्यूने हर्षदाला मानसिक धक्का बसलेला आहे. या धक्क्याने हर्षदा चे स्वप्न पूर्णतः उध्वस्त झालेले आहे, हर्षदाची मानसिक अवस्था खूपच वेदनादायी असून तिला पुढील आयुष्य जगण्याचा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे.

टॅग्स :Puneपुणेmarriageलग्नHeart Attackहृदयविकाराचा झटकाSocialसामाजिकDeathमृत्यू