बोपदेव घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार उलटून तरुणाचा मृत्यू; चार मित्र जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 17:54 IST2021-02-24T17:51:51+5:302021-02-24T17:54:09+5:30
बोपदेव घाटातील उतारावर चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटले...

बोपदेव घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार उलटून तरुणाचा मृत्यू; चार मित्र जखमी
पुणे : चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार उलटून झालेल्या अपघातात एक तरुण ठार झाला असून ४ जण जखमी झाले. हा अपघात बोपदेव घाटात मंगळवारी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास घडला.
कृष्णकांत नंदकुमार कळसे (वय २५, रा. येवलेवाडी, टिळेकरनगर) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. योगेश परिहार, चैतन्य गणेश गांधी, प्रथमेश टकले अशी जखमी झालेल्या इतरांची नावे आहे.
पाच मित्र मोटारीने सासवडवरुन पुण्याकडे काल रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास येत होते. बोपदेव घाटातील उतारावर चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे मोटार पलटी होऊन त्यात कृष्णकांत कळसे यांचा जागीच मृत्यु झाला. इतर चौघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीखक चैत्राली गपाट व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.