शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

"राणेंना अटक करून तुम्ही सुरुवात केली, आता शेवट आम्ही करू", आशिष शेलारांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 21:09 IST

महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या एकमेकांविरुद्ध बोललेल्या एक सिनेमा चालेल एवढ्या वादग्रस्त वक्तव्याच्या सीडी आमच्याकडे आहेत

ठळक मुद्देभाजप कार्यालयावरील हल्ल्याचा शिवसेनेने तमाशा केला तर आम्ही तांडव करू

लाखेवाडी : भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करून तुम्ही सुरुवात केली, आता शेवट आम्ही करू, असा स्पष्ट इशारा भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला व महाविकास आघाडी सरकारला इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर येथे पत्रकार परिषदेत दिला.

महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या एकमेकांविरुद्ध बोललेल्या एक सिनेमा चालेल एवढ्या वादग्रस्त वक्तव्याच्या सीडी आमच्याकडे आहेत, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी भाजप नेते हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.

नारायण राणे यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. महाविकास आघाडी सरकारने नारायण राणे यांना जाणून बुजून मुद्दाम केलेल्या अटकेचा शेलार यांनी निषेध केला. भाजप कार्यालयावरील हल्ल्याचा शिवसेनेने तमाशा केला तर आम्ही तांडव करू, त्याची जबाबदारी मुख्यमंत्री व शिवसेना वर राहील असेही ते म्हणाले आहेत.

''महाविकास आघाडी सरकारमधील नेते एकमेकांना बोलतानाच्या सीडी आम्ही उघडल्या तर हे एकमेकांवरच गुन्हे दाखल करतील ,अशी यांची परिस्थिती आहे. यापूर्वीही खासदार राहुल गांधी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकमेकांना काय बोलत होते ,हे सर्वांना माहीत आहे. स्वातंत्र्य दिनाचा हीरक महोत्सव व अमृत महोत्सव याचा फरक मुख्यमंत्र्याला समजत नाही, ही दुर्दैवी बाब आहे, या चुकीबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ नये, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला.''         ..हर्षवर्धन पाटील यांचेवर मोठ्या जबाबदारीचे संकेत

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपचे आज मोठे नेते आहेत, उद्याही मोठेच नेते राहणार आहेत. सहकार क्षेत्रातील ते अतिशय अभ्यासू नेते आहेत. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी त्यांची चर्चा असते,असे नमूद करून भविष्यात हर्षवर्धन पाटील यांच्यावर निश्चितच मोठी जबाबदारी सोपविली जाईल, असे स्पष्ट संकेत आशिष शेलार यांनी यावेळी बोलताना दिले.

टॅग्स :PuneपुणेNarayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAshish Shelarआशीष शेलार