शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
5
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
6
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
7
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
8
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
9
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
10
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
12
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
13
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
14
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा
15
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
16
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
17
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
18
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
19
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

डॉक्टरांप्रमाणे तुम्हीही बनू शकता ‘देवदूत’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 1:44 PM

कोणत्याही ठिकाणी काय परिस्थिती निर्माण होईल याचा अंदाज कुणालाही देता शक्य नाही..तिथे डॉक्टर असतीलच असे नाही.

ठळक मुद्देदेशात अ‍ॅकॅडमीद्वारे केवळ ३५ केंद्रांना राष्ट्रीय पातळीवर मान्यता ससून रुग्णालयामध्ये नुकतेच सर्वसामान्यांसाठी याचे प्रशिक्षण सुरूप्रशिक्षणासाठी आवश्यक प्रौढांच्या २० आणि लहान मुलांच्या २० मानवी ‘डमी’एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिपच्या कालावधीत तीन तासांचे प्रशिक्षण बंधनकारक किमान ३० ते ४० जणांचा गट असल्यास त्यांना एकत्रितपणे मोफत प्रशिक्षण देणे शक्य डॉ. आरती किणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आठ जण देतात प्रशिक्षण

पुणे : विमानामध्ये एका प्रवाशाचे बंद पडलेले हृदय पुन्हा सुरू करून त्यांना डॉक्टरांनी जीवनदान दिले. पण या विमानात डॉक्टर नसते तर... कोणत्याही ठिकाणी असा प्रसंग ओढावू शकतो. तिथे डॉक्टर असतीलच असे नाही. सर्वसामान्य नागरिकांनाही जीवन संजीवनी अर्थात कार्डिओपल्मनरी रेस्युसीटेशन (सीपीआर) देऊन बंद हृदय सुरू करता येते. तुम्हीही डॉक्टरांप्रमाणे ‘देवदूत’ बनू शकता. ससून रुग्णालयामध्ये नुकतेच सर्वसामान्यांसाठी याचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.नागपुर ते पुणे यादरम्यानच्या विमान प्रवासात ससून रुग्णालयातील बालरोग विभागातील सहयोगी प्राध्यापक व सीपीआर केंद्राचे संचालक डॉ. उदय राजपूत यांनी एका प्रवाशाचे प्राण वाचविले. कोल्हापूर येथील अशोक जाधव (वय ५८ वर्षे) यांना हृदयविकासाचा झटका आला होता. डॉ. राजपुत यांनी तातडीने ‘सीपीआर’ सुरू केल्याने जाधव यांचे हृदयाचे ठोके पुन्हा सुरू झाले. डॉ. राजपूत हे ‘सीपीआर’चे प्रशिक्षक आहेत. त्यामुळे त्यांना हे शक्य झाले. असे प्रसंग दैनंदिन जीवनात कुठेही, कोणत्याही वेळी घडू शकतात. पण प्रत्येक ठिकाणी असे डॉक्टर असतीलच असे नाही. एखाद्याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तातडीने ‘सीपीआर’ देणे सर्वसामान्य नागरिकांनाही शक्य आहे. वैद्यकीय मदत मिळेपर्यंत प्रथमोपचार म्हणून ‘सीपीआर’चे महत्व जागतिक पातळीवर मान्य करण्यात आलेले आहे. त्यामुळे याबाबतचे शास्त्रशुध्द प्रशिक्षणही दिले जाते.   

भारतामध्ये इंडियन अ‍ॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक आणि अमेरिकन हार्ट असोसिएशनने तयार केलेल्या कोर्सद्वारे प्रशिक्षण देण्यात येते. देशात अ‍ॅकडमीद्वारे केवळ ३५ केंद्रांना राष्ट्रीय पातळीवर मान्यता आहे. त्यामध्ये आता ससून रुग्णालयाचाही समावेश झाला आहे. राज्यामध्ये ससूनसह केवळ चारच अशी केंद्र आहेत. ससूनमध्ये २०१५ पासून असे प्रशिक्षण दिले जाते. पण आतापर्यंत प्रामुख्याने डॉक्टर, नर्सेससाठीच हे प्रशिक्षण होते. त्यासाठी प्रत्येकी किमान २०० रुपये शुल्क घेतले जाते. एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिपच्या कालावधीत तीन तासांचे प्रशिक्षण बंधनकारक आहे. केंद्राला आता राष्ट्रीय मान्यता मिळाल्याने सर्वसामान्यांना प्रशिक्षण देण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. प्रशिक्षणासाठी आवश्यक प्रौढांच्या २० आणि लहान मुलांच्या २० मानवी ‘डमी’ मदतरुपाने मिळाल्या आहेत.  ...............तुम्हीही बनू शकता ‘देवदुत’सर्वसामान्यांनी ३ ते ४ तासांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर तेही ‘सीपीआर’ देऊन प्राण वाचवू शकतात. किमान ३० ते ४० जणांचा गट असल्यास त्यांना एकत्रितपणे मोफत प्रशिक्षण देणे शक्य आहे. रुग्णालयातील केंद्रामध्ये त्यासाठी सर्व सुविधा आहेत. तसेच इतर ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध असल्यास तिथेही हे प्रशिक्षण दिले जाऊ शकते. बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. आरती किणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आठ जण प्रशिक्षण देतात. - डॉ. उदय राजपूत, संचालक, सीपीआर केंद्र, ससून रुग्णालय

टॅग्स :PuneपुणेHeart Attackहृदयविकाराचा झटकाdoctorडॉक्टरHealthआरोग्यsasoon hospitalससून हॉस्पिटल