पुणे : विमानामध्ये एका प्रवाशाचे बंद पडलेले हृदय पुन्हा सुरू करून त्यांना डॉक्टरांनी जीवनदान दिले. पण या विमानात डॉक्टर नसते तर... कोणत्याही ठिकाणी असा प्रसंग ओढावू शकतो. तिथे डॉक्टर असतीलच असे नाही. सर्वसामान्य नागरिकांनाही जीवन संजीवनी अर्थात कार्डिओपल्मनरी रेस्युसीटेशन (सीपीआर) देऊन बंद हृदय सुरू करता येते. तुम्हीही डॉक्टरांप्रमाणे ‘देवदूत’ बनू शकता. ससून रुग्णालयामध्ये नुकतेच सर्वसामान्यांसाठी याचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.नागपुर ते पुणे यादरम्यानच्या विमान प्रवासात ससून रुग्णालयातील बालरोग विभागातील सहयोगी प्राध्यापक व सीपीआर केंद्राचे संचालक डॉ. उदय राजपूत यांनी एका प्रवाशाचे प्राण वाचविले. कोल्हापूर येथील अशोक जाधव (वय ५८ वर्षे) यांना हृदयविकासाचा झटका आला होता. डॉ. राजपुत यांनी तातडीने ‘सीपीआर’ सुरू केल्याने जाधव यांचे हृदयाचे ठोके पुन्हा सुरू झाले. डॉ. राजपूत हे ‘सीपीआर’चे प्रशिक्षक आहेत. त्यामुळे त्यांना हे शक्य झाले. असे प्रसंग दैनंदिन जीवनात कुठेही, कोणत्याही वेळी घडू शकतात. पण प्रत्येक ठिकाणी असे डॉक्टर असतीलच असे नाही. एखाद्याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तातडीने ‘सीपीआर’ देणे सर्वसामान्य नागरिकांनाही शक्य आहे. वैद्यकीय मदत मिळेपर्यंत प्रथमोपचार म्हणून ‘सीपीआर’चे महत्व जागतिक पातळीवर मान्य करण्यात आलेले आहे. त्यामुळे याबाबतचे शास्त्रशुध्द प्रशिक्षणही दिले जाते.
डॉक्टरांप्रमाणे तुम्हीही बनू शकता ‘देवदूत’
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 13:59 IST
कोणत्याही ठिकाणी काय परिस्थिती निर्माण होईल याचा अंदाज कुणालाही देता शक्य नाही..तिथे डॉक्टर असतीलच असे नाही.
डॉक्टरांप्रमाणे तुम्हीही बनू शकता ‘देवदूत’
ठळक मुद्देदेशात अॅकॅडमीद्वारे केवळ ३५ केंद्रांना राष्ट्रीय पातळीवर मान्यता ससून रुग्णालयामध्ये नुकतेच सर्वसामान्यांसाठी याचे प्रशिक्षण सुरूप्रशिक्षणासाठी आवश्यक प्रौढांच्या २० आणि लहान मुलांच्या २० मानवी ‘डमी’एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिपच्या कालावधीत तीन तासांचे प्रशिक्षण बंधनकारक किमान ३० ते ४० जणांचा गट असल्यास त्यांना एकत्रितपणे मोफत प्रशिक्षण देणे शक्य डॉ. आरती किणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आठ जण देतात प्रशिक्षण