"तू साप बनून त्याच्याबरोबर राहतेस..." पतीच्या प्रेयसीने पत्नीला मारहाण करत घेतला चावा

By विवेक भुसे | Updated: June 12, 2023 18:50 IST2023-06-12T18:50:03+5:302023-06-12T18:50:48+5:30

तिचा चावा घेत जखमी केल्याचा प्रकार समोर...

"You become a snake and live with him..." Husband's lover beats his wife and takes a bite | "तू साप बनून त्याच्याबरोबर राहतेस..." पतीच्या प्रेयसीने पत्नीला मारहाण करत घेतला चावा

"तू साप बनून त्याच्याबरोबर राहतेस..." पतीच्या प्रेयसीने पत्नीला मारहाण करत घेतला चावा

पुणे : पतीच्या पूर्वीच्या प्रेमसंबंधामुळे ते वेगळे राहत होते, परंतु आता ते एकत्र राहतात. त्यामुळे चिडलेल्या प्रेयसीने महिलेला बांबूने मारहाण केली. तसेच ‘तू त्याची जिंदगी खराब करते. तू साप बनून त्याच्यासोबत राहत आहेस. त्याला सोडून जा’, असे म्हणून तिचा चावा घेत जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत महंमदवाडी येथे राहणाऱ्या एका २९ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी २७ वर्षाच्या प्रेयसीवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना महंमदवाडी परिसरात शनिवारी रात्री साडेआठ वाजता घडली.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या पतीचे व आरोपी महिलेचे पूर्वी प्रेमसंबंध होते. त्यामुळे फिर्यादी व त्यांचे पती वेगळे राहत होते. सध्या दोघे पती-पत्नी एकत्र राहतात. त्या कारणातून आरोपी प्रेयसी महिलेने फिर्यादी महिलेला तू त्याची जिंदगी का खराब करतेस, तू साप बनून त्याच्यासोबत राहत आहेस. तू त्याला सोडून जा, असे बोलून शिवीगाळ करत बांबूने हाता-पायावर, डोक्यात मारहाण केली. तसेच चावा घेऊन जखमी केले. पोलिस उपनिरीक्षक बिराजदार तपास करत आहेत.

Web Title: "You become a snake and live with him..." Husband's lover beats his wife and takes a bite