याेगिता भाेसले ठरल्या पुणे महापालिकेच्या पहिल्या महिला नगरसचिव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 09:47 IST2025-01-18T09:47:28+5:302025-01-18T09:47:54+5:30
पुणे महापालिकेच्या नगरसचिवपदावरून सुनील पारखी हे २०२० साली निवृत्त झाले होते.

याेगिता भाेसले ठरल्या पुणे महापालिकेच्या पहिल्या महिला नगरसचिव
पुणे : महापालिकेच्या नगरसचिवपदी याेगिता भाेसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या सध्या प्रभारी नगरसचिव म्हणून कार्यरत होत्या. आता त्यांना नगर सचिवपदी पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे भाेसले यांच्या रूपाने पुणे महापालिकेला पहिल्या महिला नगरसचिव मिळाल्या आहेत.
पुणे महापालिकेच्या नगरसचिवपदावरून सुनील पारखी हे २०२० साली निवृत्त झाले होते. त्यानंतर या पदावर प्रभारी नगरसचिव म्हणून शिवाजी दौंडकर यांची नियुक्ती केली होती. दौंडकर हे २०२३ साली निवृत्त झाले. त्यानंतर महापालिकेच्या राजशिष्टाचार अधिकारी योगिता भोसले यांच्याकडे प्रभारी नगरसचिवपदाचा पदभार देण्यात आला होता. सुनील पारखी हे पालिकेतून निवृत्त झाल्यानंतर नगरसचिवपद रिक्त होते. योगिता भोसले यांची नियुक्ती झाल्यामुळे तब्बल ४ वर्षांनंतर पुणे महापालिकेला नगरसचिव मिळाले आहेत.
माजी महापौर संघटनेने केले अभिनंदन
योगिता भोसले यांची झालेली निवड अतिशय योग्य आहे. पहिल्या महिला नगरसचिव होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. नगरसचिव कार्यालयात गेली अनेक वर्षे त्या काम करीत आहेत. कुठल्याही राजकारणाला बळी न पडता नियमाप्रमाणे त्या काम करीत आहेत, अशा शब्दांत माजी महापौर संघटनेच्या अध्यक्ष राजलक्ष्मी भोसले, सचिव कमल व्यवहारे आणि निमंत्रक अंकुश काकडे यांनी अभिनंदन केले.