..तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे; रोहित पवारांची आयोगाच्या निकालावर प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 22:22 IST2024-02-06T22:21:59+5:302024-02-06T22:22:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बारामती : आज सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह जरी बळकावलं असलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे,लडेंगे_और_जितेंगे,अशा शब्दात ...

..तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे; रोहित पवारांची आयोगाच्या निकालावर प्रतिक्रिया
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : आज सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह जरी बळकावलं असलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे,लडेंगे_और_जितेंगे,अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी त्यांची प्रतिक्रीया सोशल मिडीयावर व्यक्त केली आहे.
आजच्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष आणि चिन्हाच्या निर्णयानंतर आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केेली आहे.ते पुढे म्हणतात,केंद्रातील महाशक्तीच्या बेलगाम सत्तेचा गैरवापर करुन फुटीर गट व्यक्तीगत स्वार्थासाठी पक्ष बळकावण्याचा असंवैधानिक निर्णय घेऊ शकतो.
परंतु आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर वाढवणं, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणं, मंबईचं महत्त्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणं, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं, राज्यातील हक्काचे प्रकल्प राज्यातच टिकवून ठेवणं,असे महाराष्ट्राच्या हिताचे कायदेशीर निर्णय केंद्रातील महाशक्तीचा वापर करुन सामान्य लोकांच्या हितासाठी मात्र त्यांना घेता येत नाहीत, यातच त्यांची लायकी कळते,अशा शब्दात पवार यांनी आजच्या निर्णयावर टीका केली आहे.