येरवडा कारागृहात कैद्याकडून कर्मचा-याला धक्काबुक्की
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 20:20 IST2018-01-10T20:19:46+5:302018-01-10T20:20:05+5:30
येरवडा कारागृहात सायंकाळी गणना करून झडती घेत असताना एका कैद्याने कर्मचा-याला धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला.

येरवडा कारागृहात कैद्याकडून कर्मचा-याला धक्काबुक्की
पुणे : येरवडा कारागृहात सायंकाळी गणना करून झडती घेत असताना एका कैद्याने कर्मचा-याला धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. ही घटना बुधवारी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे कैद्यांना त्यांच्या बराकीत परत पाठविण्यास उशीर झाला.
याबाबत येरवडा कारागृहाचे अधीक्षक यू. टी. पवार यांनी सांगितले की, दररोज सायंकाळी कैद्यांना बराकीत ठेवण्यापूर्वी त्यांची गणती करताना झडती घेऊन नंतर बराकीत पाठविण्यात येते. रोजच्या प्रमाणे बराकीत ठेवण्यापूर्वी त्यांच्या गणतीचे काम सुरू होते. यावेळी एक कर्मचारी कैद्यांची झडती घेत होता. तेव्हा एक कैदी या कर्मचा-यांच्या अंगावर धावून गेला आणि त्याने त्यांना धक्काबुक्की केली. शासकीय कामात अडथळा आणला म्हणून येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.