शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

येळकोट येळकोट जय मल्हार; भंडाऱ्याची उधळण, जेजुरीत चैत्र पौर्णिमा यात्रेला हजारो भाविक खंडेराया चरणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 15:08 IST

रणहलगी, ढोल ताशांच्या गजरात विविध रंगाच्या आणि रंगीबेरंगी रेशमी कापडाने मढविलेल्या शिखरी काठ्या गडावर दाखल होताच बहुरंगी -बहुढंगी महाराष्ट्राचे दर्शन येथे घडत होते

जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या तीर्थक्षेत्र जेजुरी गडावर चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त आज हजारो भाविकांनी देवदर्शन घेत कुलधर्म -कुलाचार केला. भंडाऱ्याच्या उधळनीबरोबरच सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात संपूर्ण गडकोट निनादला. 

राज्याच्या विविध प्रांतातून बहुजन बांधवांच्या शिखरी काठ्या गडावर दाखल झाल्या होत्या. रणहलगी ,ढोल ताशांच्या गजरात विविध रंगाच्या आणि रंगीबेरंगी रेशमी कापडाने मढविलेल्या शिखरी काठ्या गडावर दाखल होताच बहुरंगी -बहुढंगी महाराष्ट्राचे दर्शन येथे घडत होते. तिव्र उन्हाळा, परीक्षांचा काळ यामुळे या वर्षी यात्रेला भाविकांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे दिसून येत होते . 

चैत्र पौर्णिमा उत्सव हा खंडेरायाचा महत्वपूर्ण मानला जातो. चैत्र शुद्ध पौर्णिमेला दुसऱ्या प्रहरी चित्रा नक्षत्र वसंत ऋतू या दिनी शिवशंकरांनी मार्तंड भैरव अवतार धारण केला. अशी आख्यायिका असल्याने येथे पुरातन काळापासून मोठी यात्रा भरते. राज्याच्या विविध प्रांतातील बहुजन बांधव व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने येथे दाखल होत येळकोट, येळकोट असा गजर करीत भंडाऱ्याची उधळण करत कुलधर्म -कुलाचार करतात. सालाबादप्रमाणे या वर्षीही उत्सव साजरा करण्यात आला. श्री मार्तंड देवसंस्थान व्यवस्थापनाकडून भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी मल्हार गडावर सावलीचे आच्छादन करण्यात आले आहे. गडकोट आवारात थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

राज्यभरातून आलेल्या भाविकांनी आपआपल्या देवघरातील मूर्ती, देवाचे टाक, आदी देवभेटीसाठी आणले होते. नाझरे जलाशयावर स्नान, कुलधर्म कुळाचार उरकून भाविक गडावर जावून देव दर्शन घेत होते. खंडेरायाचे मूळस्थान असलेल्या कडेपठार मंदिरामध्येही चैत्र षडरात्र निमित्ताने स्वयंभू लिंगावर दवण्याची पूजा करण्यात आली. पौर्णिमेचे औचित्य साधून नित्यनेमाची पूजा करताना सुगंधी  दवणा वनस्पतींने स्वयंभू लिंग आच्छादण्यात आले. जेजुरी गडावर आज पहाटे श्री खंडोबा मंदिर गाभाऱ्यामध्ये पहाटे भूपाळी झाले नंतर दवणा पूजा करण्यात आली. श्री मार्तंड देवसंस्थान तर्फे श्री हनुमान जयंती निमित्त  गडकोटामधील श्री जरांडेश्वर येथे विश्वस्त मंगेश घोणे यांचे हस्ते पूजन करण्यात आले व ग्रामस्थ, मानकरी, पुजारी सेवेकरी वर्ग, कर्मचारी वर्ग व भाविक भक्त यांनी सामूहिक मारुती स्तोत्र पठण केले. यावेळी विश्वस्त पांडुरंग थोरवे, अड विश्वास पाणसे आदी उपस्थित होते. सुगंधी दवणा वनस्पतीचे महत्व 

कुलदैवत खंडेरायाच्या कुलधर्म -कुलाचार धार्मिक विधींमध्ये दवणा या वनस्पतीला मोठे महत्व आहे. दररोजच्या त्रिकाल पूजेमध्ये या सुगंधी वनस्पतींचा वापर केला जातो. तसेच दवणा अत्यंत सुगंधी व अतिशय थंड व गुणकारी समजली जाते. विशेष म्हणजे जेजुरी परिसरातच दवणा वनस्पतीचे उत्पन्न घेतले जाते. या वनस्पतीपासून अत्तरे, अगरबत्ती तयार केली जाते. मात्र डिसेंबर ते मार्च  या कालावधीत या वनस्पतीचे उत्पन्न घेण्यात येत असल्याने देवांच्या जत्रा यात्रा उत्सव काळात ती  हिरवी असते इतर काळात ती वाळवलेली भाविकांना उपलब्ध होते. 

टॅग्स :PuneपुणेJejuriजेजुरीKhandoba Yatraखंडोबा यात्राSocialसामाजिकTempleमंदिरMaharashtraमहाराष्ट्र