शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
4
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
5
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
6
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मरची लागेल!
7
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
10
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
11
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
12
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
13
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
14
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
15
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
16
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
17
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
18
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
19
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
20
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
Daily Top 2Weekly Top 5

यंदा द्राक्ष उत्पादनात ९ लाख टनांनी होईल घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 06:09 IST

अतिवृष्टी व लांबलेल्या पावसामुळे राज्यातील द्राक्ष पिकांचे अपरिमित नुकसान झाले

पुणे : अतिवृष्टी व लांबलेल्या पावसामुळे राज्यातील द्राक्ष पिकांचे अपरिमित नुकसान झाले असून, द्राक्ष उत्पादनात यंदा आठ ते ९ लाख टनांनी घट होण्याची शक्यता आहे. निर्यातीलाही त्याचा फटका बसणार आहे. अतिपावसाने घड कुजणे, मण्यांना तडा जाणे, डावणी व करपा रोगाचा प्रादुर्भाव अशा समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागल्याने द्राक्ष बागाईतदारांचे कंबरडेच मोडणार आहे.राज्यात जुलै आणि सप्टेंबरमध्ये जोरदार वृष्टी झाली. दिवाळीतही पावसाची हजेरी होती. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळामुळे आॅक्टोबरमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे द्राक्षांसह भात, बाजरी, मका, भाजीपाला, ऊस व फळबागांचेही नुकसान झाले आहे.पुणे जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांचे १ लाख १५ हजार ७४६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. द्राक्षाचे आगार समजल्या जाणाºया नाशिक जिल्ह्यात सुमारे तीस टक्क्यांहून अधिक द्राक्ष बागांचे नुकसान झाले.पुणे जिल्ह्यात बारामती, इंदापूर व जुन्नर येथील बागांचे नुकसान झाले आहे. त्यात नानापर्पल, फ्लेम सिडलेस, जंबो सिडलेस व शरद सिडलेस द्राक्षांचा समावेश आहे. द्राक्ष बागाईतदार संघाचे खजिनदार कैलास भोसले म्हणाले की, राज्यात ४० ते ४२ दिवस जोरदार पाऊस झाला. द्राक्ष पीक साडेचार ते पाच महिन्यांचे असते. नोव्हेंबरमध्ये द्राक्षे छाटणीला येतात. पावसामुळे फुलोरा, मणी धरणे ते छाटणीपर्यंत प्रत्येक टप्प्यात द्राक्ष बागांना नुकसानीचा सामना करावा लागला.राज्यात द्राक्षाचे तब्बल साडेतीनते चार लाख एकर क्षेत्र आहे. त्यापैकी ८० ते ९० हजार हेक्टरवरील बागांचे साठ ते शंभर टक्के नुकसान झाले आहे. राज्यात दरवर्षी सरासरी ३५ लाख टन द्राक्षांचे उत्पादन होते. त्यातील अडीच लाख टन द्राक्षांची निर्यात होते. उर्वरित द्राक्षे ही स्थानिक बाजारपेठेत विकली जातात. यंदा ८ ते ९ लाख टनांनी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. दरवर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू होणारी निर्यात पूर्णपणे थांबली आहे.>विमा सक्तीचा करावाद्राक्ष पिकासाठी शेतकºयांना १५ हजार ४०० रुपये विमा शुल्क भरावे लागते. तितकेच शुल्क सरकार भरते. सरकारने पन्नासऐवजी ९० टक्के विमा शुल्क भरावे. त्यानंतर, विमा उतरविणे सक्तीचे करावे.- कैलास भोसले, खजिनदार,महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ