शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

यवतला दोन दुकाने फोडली

By admin | Updated: October 8, 2015 05:33 IST

यवतमध्ये कारचोरीच्या पाठोपाठ दुसऱ्या दिवशी दोन दुकानांचे शटर उचकटून सुमारे ६० हजार रुपयांचा माल व रोख रक्कम चोरांनी लंपास केली आहे. ही घटना काल

यवत : यवतमध्ये कारचोरीच्या पाठोपाठ दुसऱ्या दिवशी दोन दुकानांचे शटर उचकटून सुमारे ६० हजार रुपयांचा माल व रोख रक्कम चोरांनी लंपास केली आहे. ही घटना काल (दि.६) रात्रीच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गाच्या बाजूला असलेल्या मेहता कॉम्पलेक्समध्ये घडली.मागील दोन दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास यवत स्टेशन रोड व गावठाण परिसरात चारचाकी वाहनचोरीची घटना ताजी असताना, आता दुकानांमध्ये चोरी घडल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.काल रात्रीच्या सुमारास मेहता कॉम्पलेक्समधील युनिव्हर्सल इलेक्ट्रॉनिक्स व बालाजी ट्रेंडिंग कंपनी या दोन दुकानांची शटर उचकटली व दुकानांमध्ये प्रवेश करून, रोख रक्कम व काही माल लंपास केला. याबाबत बापू दत्तात्रय जगदाळे यांनी यवत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. सदर फिर्यादीनुसार युनिव्हर्सल इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाचे शटर चोरांनी उचकटून आतील मोठी काच फोडून दुकानात प्रवेश केला. या वेळी दुकानातील रोख रक्कम ३१ हजार रुपये, एक मोबाईल व इतर इलेक्ट्रिक वस्तू असा एकूण ५५,४०० रुपयांचा ऐवज चोरांनी लंपास केला आहे. बालाजी ट्रेंडिंग कंपनीमधील चोरीबाबत मात्र पोलिसांत तक्रार दाखल केली नव्हती. (वार्ताहर)