शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

यवतमध्ये कुल -थोरात गटात होणार चुरशीची लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:30 IST

यवत: दौंड तालुक्यातील सर्वाधिक मतदार संख्या असलेल्या यवत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत १७ जागांसाठी कुल व थोरात गटात चुरशीची लढत होणार ...

यवत: दौंड तालुक्यातील सर्वाधिक मतदार संख्या असलेल्या यवत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत १७ जागांसाठी कुल व थोरात गटात चुरशीची लढत होणार असल्याचे चित्र आज स्पष्ट झाले.राजकीय दृष्ट्या संवेदनशील आलेल्या यवत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व सहा वार्ड मध्ये कुल व थोरात गटात थेट लढत तर काही ठिकाणी अपक्ष देखील त्यांचे नशीब आजमावत आहेत.

वार्ड क्रमांक १ , वार्ड क्रमांक ५ व वार्ड क्रमांक ६ मध्ये प्रत्येकी ३ जागांसाठी ६ उमेदवार निवडणुकीत आहेत.या तीनही वार्डात कुल व थोरात गटाच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे.

वार्ड क्रमांक २ मध्ये ३ जागांसाठी ७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.यातील सर्वसाधारण व महिला राखीव अशा दोन जागांसाठी ४ उमेदवार असल्याने येथेही कुल थोरात गटात लढत आहे.तर नागरिकांचा मागास प्रवर्ग या जागेसाठी तीन उमेदवारी अर्ज असल्याने तिहेरी लढत होणार आहे.

वार्ड क्रमांक ३ मध्ये २ जागांसाठी ६ उमेदवार रिंगणात असल्याने दोन जागांसाठी तिहेरी लढत येथे होणार आहे वार्ड क्रमांक ४ मध्ये ३ जागांसाठी ८ उमेदवार रिंगणात आहेत.यातील सर्वसाधारण महिला व नागरिकांचा मागास प्रवर्ग या दोन जागांसाठी ४ अर्ज असल्याने येथे थेट लढत होणार आहे , तर अनुसूचित जातीच्या एका जागेसाठी ४ उमेदवार आहेत.

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याच्या चर्चेआडून अनेक राजकीय डाव प्रतिडाव मागील पंधरा दिवसात गाव पुढाऱ्यांकडून सुरू होते. उमेदवारांच्या माघारी होईपर्यंत नेमके कोण कोणाच्या विरोधात याचा थांगपत्ता सर्वसामान्य नागरिकांना लागत नव्हता.मात्र आता अर्ज माघारीच्या मुदती नंतर गावपुढाऱ्यांचे भवितव्य मतदारांच्या हाती गेले आहे. मागील दहा वर्षांपासून माजी आमदार थोरात गटाने यवत ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखले आहे. आता सलग तिसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी थोरात गटाने कंबर कसली आहे.तर आमदार कुल गट देखील मागील दोन पराभव विसरून नव्याने निवडणूक रिंगणात उतरला आहे.