शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी व कथाकार धर्मराज निमसरकर यांचे पुण्यात निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 6:15 PM

धर्मराज कवी व कथाकार म्हणून आंबेडकरवादी साहित्य-विश्वात परिचित.

ठळक मुद्देधर्मराज निमसरकर एक संवेदनशील कवी, कथा व कादबंरीकार व उत्तम वक्ते म्हणून प्रसिद्ध

पुणे : सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी व कथाकार धर्मराज निमसरकर यांचे पुण्यात राहत्या घरी निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. मागील एक वर्षापासून कर्करोगाने आजारी होते. त्यांच्या मागे पत्नी, कन्या आणि नातवंडे असा परिवार आहे. निमसरकर यांच्या पार्थिवावर नातेवाईक  व मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत विश्रांतवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.धर्मराज कवी व कथाकार म्हणून आंबेडकरवादी साहित्य-विश्वात परिचित होते. त्यांचा जन्म ५ नोव्हेंबर १९४९ साली वणी परिसरातील राजूर (कॉलरी) या गावी झाला. कोळसा आणि चुन्याच्या खाणीत त्यांचे कुटुंब मजुरी करायचे. विपरित परिस्थितीतही त्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही. नागपुरातून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते एका इलेक्ट्रॉनिक कंपनीत इंजिनीयर म्हणून रुजू झाले. नागपुरातील सामाजिक आंदोलने आणि चळवळीने त्यांना लेखनाचे बळ दिले होते. नागपूरच्या मुक्तीवाहिनीच्या संस्थापनात त्यांचा सहभाग होता. १९७३ मध्ये भाभा आटोमिक रिसर्च सेंटरमध्ये काही काळ नोकरी केल्यानंतर ते पुण्यातील भारत इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीत रुजू झाले.धर्मराज निमसरकर एक संवेदनशील कवी, कथा व कादबंरीकार व उत्तम वक्ते म्हणून प्रसिद्ध होते. 'अंतहीन' व 'उसवलेलं आकाश' या कथासंग्रहातून त्यांनी साहित्य विश्वात स्थान निर्माण केले. 'ठसठसणा-या जखमा', 'संकेतबंड',  'निळ्या पहाटेच्या सूर्यपूत्रांचे अधोरेखित' , 'वेदनास्पर्श' या कांदब-याना साहित्य चळवळीत मानाचे स्थान मिळाले. त्यांना अस्मितादर्श पुरस्कार आणिलोकानुकंपातर्फे कथा वाड्मय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.                                                                                                                                      

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्यDeathमृत्यू