Martin Garrix: जगप्रसिद्ध डीजे मार्टिन गॅरीक्सची पुण्यात रिक्षातून सफर; होळीच्या शुभेच्छा देत फोटो केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 20:16 IST2023-03-08T20:07:09+5:302023-03-08T20:16:01+5:30

मार्टिन गॅरीक्सने होळीच्या शुभेच्छा देत सोशल मीडियावर फोटो शेअर केला...

World famous DJ Martin Garrix's rickshaw ride in Pune; Happy Holi photo shared | Martin Garrix: जगप्रसिद्ध डीजे मार्टिन गॅरीक्सची पुण्यात रिक्षातून सफर; होळीच्या शुभेच्छा देत फोटो केला शेअर

Martin Garrix: जगप्रसिद्ध डीजे मार्टिन गॅरीक्सची पुण्यात रिक्षातून सफर; होळीच्या शुभेच्छा देत फोटो केला शेअर

पुणेजगप्रसिद्ध डीजे मार्टिन गॅरीक्सने पुण्यात रिक्षातून प्रवास करत शहरातून फेरफटका मारला. त्याला पुणे शहरात रिक्षात बसून प्रवास करण्याचा मोह आवरता आला नाही. मार्टिन गॅरीक्स हा प्रसिद्ध डीजे असून जगातील टॉप १० डीजेच्या यादीत त्याचे नाव आहे.

एका कार्यक्रमासाठी मार्टिन गॅरीक्स काल पुण्यात आला होता. यावेळी त्याने कार्यक्रम संपवून एका ठिकाणी जाण्यासाठी चक्क रिक्षाने प्रवास केला. याचा फोटो मार्टिन गॅरीक्सने स्वतः सोशल मीडियावर शेयर केला आहे. होळीच्या दिवशी झालेल्या एका कार्यक्रमानंतर त्याने पुण्यातील चाहत्यांचे धन्यवाद देखील केले. गॅरीक्सने सर्व चाहत्यांना आणि पुणेकरांना होळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

 

पुण्यात एका कार्यक्रमासाठी गॅरीक्स आला होता. यावेळी पुणे शहरात त्याने रिक्षातून प्रवास करत आनंद घेतला. याबद्दलची पोस्ट त्याने फेसबूक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर शेअर केली.

 

Web Title: World famous DJ Martin Garrix's rickshaw ride in Pune; Happy Holi photo shared