शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

जागतिक प्राणी दिन विशेष , देवराई टिकली, तर टिकेल वन्यजीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 06:31 IST

देवासाठी राखून ठेवलेले वन म्हणजे ‘देवराई’ या श्रद्धेमुळे देवरायांमध्ये प्राणी, हजारो वर्षांची झाडे, औषधी वनस्पती जतन राहिल्या आहेत.

नीलेश काण्णवघोडेगाव : देवासाठी राखून ठेवलेले वन म्हणजे ‘देवराई’ या श्रद्धेमुळे देवरायांमध्ये प्राणी, हजारो वर्षांची झाडे, औषधी वनस्पती जतन राहिल्या आहेत. देवरायांमध्ये वाढणाºया वनस्पती व प्राण्यांना इजा पोहचल्यास देवाचा कोप होतो, अशी समजूत लोकांमध्ये आहे. यामुळे माणुस आणि निसर्ग यांचे नाते टिकून आहे. या देवरायांमध्ये अनेक प्राणी, पशुपक्षी, किटकांचा अधिवास आहे. या देवरायांकडे आता दुर्लक्ष होऊ लागले असून देवराया सुरक्षीत राहिल्यास हजारो वर्षांचा ठेवा जतन राहणार आहे.

भारतात अंदाजे चौदा हजार तर महाराष्ट्रात चार हजार देवराई असल्याचे केंद्र सरकारच्या सीपीआर पर्यावरण शिक्षण केंद्राने केलेल्या पाहणी अहवालात म्हटले आहे. काही तज्ज्ञांच्या मते देशात एक लाखापेक्षाही जास्त देवराया आहेत. देशात हिमाचल प्रदेशमध्ये सर्वांत जास्त देवराया पाहायला मिळतात. कर्नाटक, उत्तराखंड, केरळ राज्यांमध्ये मोठ्या आकाराच्या देवराया आहेत. महाराष्ट्रात जास्त देवराया पश्चिम घाटातील पुणे, रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यात आहेत.

या देवरायांच्या संरक्षणासाठी आदिवासी समाजाने काही नियम आखून ठेवले आहेत. या देवराईत कोणीही झाडे तोडू शकणार नाही, जळणासाठी लाकूड घेणार नाही, फळे तोडणार नाही, तसेच खाली पडलेली फळे-फुलेही कोणी घेणार नाही, असे नियम आहेत. आदिवासी समाजात फक्त उत्सवामध्ये जेवण तयार करण्यासाठी देवराईत पडलेली वाळलली लाकडे घेतली जातात. काही देवरार्इंमध्ये आदिवासी लोक चप्पल घालूनही जात नाहीत. देवराईतून वाहणारे पाणीही आदिवासी लोक चप्पल घालून ओलांडत नाहीत. देवराई राखून आदिवासी लोकांनी निसर्गाशी समतोल साधून घेतला आहे.

देवराईमध्ये असलेल्या मंदिरात स्थानिक देवतांचे वास्तव्य असते. हा देवच आपले रक्षण करतो, अशी आदिवासी लोकांची धारणा आहे. देवराईतील वाळलेले पान ही खाजगी वापरासाठी कोणी घेऊ शकत नाही. जर देवराईचे नियम मोडल्यास यातील देवता स्वप्नात येऊन, याचा जाब विचारतो, अशी समजूत आहे. याचा परिणाम खोलवर आहे. यामुळे निसर्गाची जपणूक साधली जात आहे.काही देवरायांमधून स्थानिक लोकांना विशिष्ट काळात, विशिष्ट दिवशी, विशिष्ट कामासाठी वस्तु घेण्याची परवानगी आहे. थोडक्यत काही देवरार्इंमध्ये एका कुटुंबाला एकच बांबू घेण्याची परवानगी आहेत.देवरायांच्या संरक्षणात शासनाचे लक्ष हवेया देवरायांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी शासनाने लक्ष दिले पाहिजे. देवराया टिकल्या तर पुरातन काळातील झाडे, वेली येथील जैवविविधता टिकेल, यातील प्राणी, पशु, पक्षी, किटक टिकतील.वन कायद्यांमध्येही यांच्या संरक्षणासाठी ठोस तरतूद नाही. काळाप्रमाणे या देवयारांकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. स्थानिक लोकही नियम डावलून देवरायांमध्ये गुरे चरण्यासाठी सोडताना दिसतात.देवरायांचे महत्व पटवून त्यांचे जतन करण्यासाठी या देवराया संरक्षीत ठिकाण म्हणून जाहीर केल्या पाहिजेत.

टॅग्स :Puneपुणे